Pune Commissioner : आयुक्तांच्या घरात २० लाखांची चोरी, नेमकं गौडबंगाल काय?

Pune Commissioner

विशेष प्रतिनिधी

पुणे: पुणे महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातुन लाखोंचा ऐवज चोरीला गेला आहे. ज्यात एसी, झुंबर, ॲक्वागार्ड, टीव्ही, किचन टॉप युनिट, डायनिंग टेबल, कॉफी मशिन, फुलांच्या कुंड्या यांसारख्या वस्तूंचा समावेश आहे. एकूण २० ते ३० लाखांचं सामान चोरीला गेल्याचं सध्या म्हटलं जातंय. मात्र याबाबत कुठलीही तक्रार अजून झालेली नाही. Pune Commissioner

पुणे महापालिका आयुक्तांच ‘तपस्या’ हे शासकीय निवासस्थान मॉडेल कॉलनी या परिसरात स्थित आहे. यापूर्वी येथे राहत असलेले माजी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले हे मे महिन्यात निवृत्त झाले. त्यांनी जूनदरम्यान ‘तपस्या’ हे महापालिका आयुक्तांसाठी असणारं शासकीय निवासस्थान रिकाम केलं. त्यानंतर ऑगस्ट दरम्यान, दीड महिन्यांनी नवल किशोर राम हे नवीन आयुक्त बंगल्यावर रहायला आल्यावर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. यात केवळ एसी, टीव्ही यांसारख्याच वस्तू नाही तर, पुण्यातील ऐतिहासिक वास्तूंची चित्रे आणि जुन्या काळातील कास्य व पितळी धातूचे दिवे देखील चोरीला गेले आहेत.



या बंगल्यांचा नेमका विषय तरी काय?

या घटनेमुळे आता बंगल्याच्या सुरक्षेबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अद्यापही याबाबतीत तक्रार न नोंदवल्यामुळे खरंच चोरी झाली आहे की या सगळ्या वस्तू गायब केल्या आहेत? असाही प्रश्न या संदर्भात विचारला जातोय. शासकीय निवस्थानातून अश्या वस्तू गायब होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील १० वर्षांपूर्वी महापौरांच्या बंगल्यातून टीव्ही चोरीला गेला होता, मात्र तो चोर अजूनही सापडला नाहीये. Pune Commissioner

बंगल्याची जबाबदारी कोणाची?

बंगल्याची जबाबदारी पुणे महापालिकेच्या भवन, विद्युत आणि सुरक्षा विभागाची आहे. मात्र, साहित्य गायब होण्याबाबत कोणतीही स्पष्ट जबाबदारी निश्चित झालेली नाही त्यामुळे याबाबत अजून तरी कोणतेही ठोस उत्तरं मिळालेले नाही. मात्र, पालिका आयुक्तांनी चौकशी करून कारवाई करणार असल्याचं म्हणलंय.

दरम्यान, आता हा बंगला पुन्हा तयार करण्यासाठी २० लाख रुपये खर्चून नवीन साहित्य खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यामध्ये एसी, टीव्ही, वॉटर प्युरिफायर यासारख्या गोष्टींचा समावेश आहे.

२४ तास सुरक्षा यंत्रणा तैनात असतांना, जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असतांना इतक्या वस्तू गायब झाल्याच कशा? अजूनही याबाबत कोणतीच तक्रार का केली गेली नाही? या प्रश्नांची उत्तरं मात्र अजूनही मिळालेली नाहीत.

Goods worth 20 lakhs stolen from Pune Commissioner’s house, What exactly is the case?

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात