वृत्तसंस्था
वॉशिंग्टन डीसी : Trump डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकेत स्थलांतरितांविरुद्ध आक्रमक कारवाई सुरूच आहे. ट्रम्प प्रशासनाने स्थलांतरितांवर दबाव आणण्यासाठी एक नवीन रणनीती स्वीकारली. त्यात आश्रय मागणाऱ्या पालकांना दोन पर्याय दिले जातात. – हद्दपारीचा आदेश स्वीकारणे किंवा त्यांच्या मुलांपासून वेगळे होणे. हे धोरण ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातील कुप्रसिद्ध ‘कुटुंब वेगळे करणे’ धोरणाची एक नवीन आवृत्ती मानली जाते. आता नवीन रणनीतीमध्ये आधीच अमेरिकेत दाखल झालेल्या स्थलांतरितांना लक्ष्य केले जाते. हा समुदाय हद्दपारीच्या आदेशांना तोंड देत आहेत. न्यूयॉर्क टाईम्सने सरकारी कागदपत्रे आणि केस फाइल्सच्या आधारे ९ कुटुंबे शोधली. ती ट्रम्प प्रशासनाच्या या धोरणाचे बळी ठरली आहेत. अधिकाऱ्यांनुसार पालकांकडे संपूर्ण कुटुंबासह देश सोडण्याचा किंवा वेगळे होण्यास स्वीकारण्याचा पर्याय आहे. तीन कुटुंबांच्या कथेतून किती तणाव वाढणार आहे ते जाणून घ्या.Trump
विलग होण्याऐवजी भारतीय जोडपे मायदेशी परतले
अहवालात एका भारतीय जोडप्याचाही उल्लेख आहे. त्यांना तीन मुलांसह अमेरिकेत आश्रय हवा होता. परंतु आयसीई अधिकाऱ्यांनी त्यांच्यासोबतही हीच प्रक्रिया स्वीकारली. तेव्हा त्यांनी व्यावसायिक विमानाने हद्दपार करण्यास नकार दिला. आयसीईने त्यांना ‘कायदेशीर आदेशाचे उल्लंघन’ केल्याबद्दल दोषी मानून वेगळे केले. शेवटी पालकांनी भारतात परतण्यास सहमती दर्शविली. परंतु मुलांना तिथेच सोडले. अंतर्गत कागदपत्रांनुसार हे वेगळे करणे’ होते. आयसीई आता त्या मुलांना भारतात पाठवण्याच्या प्रक्रियेत आहे.Trump
रशियाला जाण्यास नकार, तिसऱ्या देशात पाठवणार..
रशियन पत्नीच्या राजकीय अटकेनंतर पाॅवेल स्नेगिर त्याच्या ११ वर्षीय मुलगा अलेक्झांडरसह अमेरिकेत पोहोचले. तेव्हा आयसीई ने त्याला न्यूयॉर्कला पाठवण्याचा प्रयत्न केला. पाॅवेलने विरोध केला. त्याच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्याला जबरदस्तीने ताब्यात घेण्यात आले आणि मुलाला वेगळ्या आश्रयस्थानात पाठवण्यात आले. दुसऱ्या दिवशी पाॅवेलने आयसीईची सुरक्षा तपासणी उत्तीर्ण केली. त्यामुळे त्याला रशियाला पाठवता आले नाही. आता आयसीई त्याला तिसऱ्या देशात पाठवण्याचा प्रयत्न करत आहे.
वॉशिंग्टन | ट्रम्प प्रशासनाने असा दावा केला की २०२५ हे अमेरिकेच्या इतिहासात ‘निगेटिव्ह नेट मायग्रेशन’ असे पहिले वर्ष असू शकते. म्हणजेच देश सोडणाऱ्या लोकांची संख्या येणाऱ्या लोकांपेक्षा जास्त असेल. व्हाईट हाऊसने या दाव्याला प्रोत्साहन दिले. परंतु ठोस डेटा सादर केला नाही.
व्हाईट हाऊसने ‘५० वर्षांत प्रथमच’ असे संबोधून ‘आश्वासने पूर्ण करण्याचा’ दावा करणारे ग्राफिक्स शेअर केले. परंतु तज्ञ आणि इतर अहवालांनी ते संशयास्पद म्हटले आहे. यूएस फेडरल रिझर्व्ह बँक आणि एईआय सारख्या संस्थांचा अंदाज आहे की स्थलांतरात मोठी घट झाली. परंतु अद्याप पूर्णपणे नकारात्मक स्थलांतराची पुष्टी झालेली नाही.
तज्ज्ञ-अर्थशास्त्रज्ञांनी इशारा दिला की याचा अमेरिकन अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यावरून ट्रम्प यांनी विचार करावा.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App