चीनवर दादागिरी करता येईना म्हणून ट्रम्प यांची भारतावर दादागिरी; आयात – निर्यातीच्या वस्तूंवर 50 % tariff लादणी!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : चीनवर करता येईना म्हणून ट्रम्प यांची भारतावर दादागिरी; आयात – निर्यातीच्या वस्तूंवर 50 % tariff लादणी!!, असला प्रकार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सायंकाळी केला.

भारत रशियाकडून तेल खरेदी करतो. ती तेल खरेदी थांबवत नाही म्हणून भारतावर 25% टेरिफ लादायची धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच दिली होती. पण भारताने ट्रम्प यांच्या धमकीला भीक घातली नाही. त्या उलट अमेरिका आणि युरोपीय देश रशियाकडून काय काय खरेदी करतात याची यादीच अमेरिकेला दाखवली. त्यामुळे ट्रम्प चिडले आणि त्यांनी भारतावर 50 % tariff लादायची घोषणा केली. 17 सप्टेंबर पासून भारतात निर्यात होणाऱ्या आणि भारताकडून आयात होणाऱ्या वस्तूंवर 50 % टेरिफ लागेल.

ट्रम्प यांनी चीनवर देखील अशीच मोठा टेरिफ लादायची घोषणा केली होती. पण चीनने त्यांच्या धमकीला भीक घातली नव्हती. उलट चीनने भारत आणि अन्य देशांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर ट्रम्प यांनी चीन वरचे टेरिफ 90 दिवसांसाठी स्थगित केले. पण ते भारताला सतत धमक्या देत राहिले.

अमेरिकेत ट्रम्प प्रशासनाविरुद्ध काहूर उठले अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्र संघातल्या माजी राजदूत निकी ह्याले यांनी ट्रम्प यांना गंभीर इशारा दिला टेरिफ युद्ध पेटवून भारतासारखा सामरिक क्षेत्रातला महत्त्वाचा मित्र गमावू नका चीनला पुढे जायची संधी देऊ नका, असे निकी ह्याले यांनी ट्रम्प यांना बजावले होते. पण ट्रम्प यांनी त्यांचे न ऐकता भारतावर 50 % टेरिफ लादायची घोषणा केली.

मोदींचा चीन दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन संघटनेच्या बैठकीसाठी चीनला जाणार आहेत 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर असा तो दौरा असणार आहे. त्याआधी ते जपानला भेट देणार आहेत. मोदींच्या या दोन्ही दौऱ्यानंतर अमेरिकेची टेरिफ अंमलबजावणी होणार आहे पण मोदींचे हे दोन दौरे झाल्यानंतर अमेरिकेची जादा टेरिफ अंमलबजावणी टिकेल की नाही?, याविषयी शंका आहे.

US President Donald Trump imposes an additional 25% tariff on India over Russian oil purchases

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात