विशेष प्रतिनधी
बीड: संतोष देशमुख हत्या प्रकरणात अडकलेल्या वाल्मिक कराडच्या दोन्ही मुलाचं नाव आता महादेव मुंडे हत्या प्रकरणात जोडलं जातंय. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने (SIT) परळीतून ५ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. यामध्ये वाल्मिक कराडच्या श्रीगणेश आणि सुशील या दोन्ही मुलांचाही समावेश होता. पोलिसांनी या दोघांचीही १७ तास कसून चौकशी केल्याची माहितीही समोर आलीये. Walmik Karad
चौकशीदरम्यान, या हत्येत फरार आरोपी गोट्या गित्ते याच्यासोबत या दोघांचा सहभाग असल्याचा संशय अधिक बळावला आहे.
आरोपांवर काय म्हणला काराडांचा मुलगा?
मी, माझा भाऊ किंवा माझे वडील कोणीच महादेव मुंडेंना ओळखत नाही, तर हत्या करण्याचा प्रश्नच कुठे येतो, असं म्हणत सुशील कराडने त्याच्यावर आणि त्याच्या वडिलांवर केलेले सर्व आरोप फेटाळले. तसेच, आमची १७ तास कसून चौकशी न झाल्याचंही त्याने म्हणलंय. कराड कुटुंबाचा सदस्य म्हणून मी मुख्मंत्र्यांना या प्रकरणात सीबीआय चौकशी करण्याची विनंती करतो, जेणेकरून खरं काय ते सगळ्यांचाच समोर येईल. असं म्हणत सुशील कराड याने या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केलेली आहे.
महादेव मुंडे हत्या प्रकरण नेमकं आहे तरी काय?
२२ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी परळी तहसील कार्यालयाच्या बाहेर मुंडे यांची निर्घुण हत्या करण्यात आली होती. तपासाच्या दुसर्या दिवशी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्यांचा मृतदेह सापडला. सुरवातीला हा तपास स्थानिक पोलिसांच्या नेतृत्वाखालीच सुरु होता, परंतु कालांतराने हा तपास थांबला. यासंदर्भात, महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा सुरु केला. Walmik Karad
त्यामुळे, त्यांच्या मागणीनुसार आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात एसआयटीची स्थापना केली आहे. या पथकाचं नेतृत्व आयपीएस अधिकारी पंकज कुमावत करत आहेत. त्यामुळे, नेमकी हत्या का झाली? खरा गुन्हेगार कोण? या प्रश्नांची उत्तरं आता या तपासातून तरी मिळतील की नाही याकडे सगळ्याचं लक्ष आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App