मराठीचे स्वाभिमानी दिल्लीश्वरांसमोर झुकले; मुंबईचे सगळे प्रश्न मिटल्यामुळे कबुतरांवरून आंदोलन पेटले!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मराठीचे स्वाभिमानी दिल्लीश्वरांसमोर झुकले; मुंबईचे सगळे प्रश्न मिटल्यामुळे कबुतरांवरून आंदोलन पेटले!!, हे आजच्या दिवसभरातल्या बातम्यांचे सार ठरले.

एरवी एकमेकांवर दिल्लीश्वरांसमोर झुकण्याचा आरोप करणारे दोन शिवसेनेचे दोन नेते दिल्लीश्वरांसमोर झुकायलाच उतावीळ झाले. यापैकी उठाव केलेल्या शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे दिल्लीत पोहोचले तिथे त्यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी गाठी घेतल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणे नियोजित असल्याचे सांगण्यात आले. एकनाथ शिंदे मालकांना भेटायला आल्याचा टोमणा संजय राऊत यांनी मारला. पण पंतप्रधानांकडून महाराष्ट्रासाठी निधी आणणे हे आमचे कर्तव्य आहे, असे समर्थन मंत्री उदय सामंत यांनी केले. पण सत्तेवर नसलेल्या काँग्रेस पुढे झुकण्यासाठी उबाठाचे नेते दिल्लीत चाललेत ते तिथे काँग्रेसच्या नेत्यांबरोबर जेवणार आहेत, असा टोमणा उदय सामंत यांनी मारला. पण मराठीचा स्वाभिमान बाळगणारे आणि एकमेकांना दिल्लीश्वरांसमोर झुकण्याबद्दल ठोकणारे नेते दिल्लीतच पोहोचले किंवा पोचणार आहेत ही वस्तुस्थिती महाराष्ट्राच्या समोर आली.



दादरमध्ये कबुतरांसाठी आंदोलन

त्याचवेळी मुंबईतले सगळे प्रश्न मिटल्यामुळे दादरमध्ये कबुतरांच्या मुद्द्यावर आंदोलन पेटले. जैन महिलांनी कबूतर खान्यावर टाकलेली ताडपत्री आणि बांबू उखडून फेकले. तिथल्या कबुतरांना दाणे टाकले. त्यामुळे कबूतर खान्यापाशी तणाव निर्माण झाला. मुंबई पोलीस तिथे पोहोचले. दंगल विरोधी पथकाने आंदोलकांना हटविले. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यामुळे आम्ही समाधानी आहोत. दादरच्या जैन समाजाच्या मंदिराच्या विश्वास त्यांनी आंदोलन केले नाही किंवा आंदोलनाचे आवाहनही केले नाही. आंदोलन बाहेरच्या लोकांनी केले, असे मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले‌.

जैन समाज हळवा आहे. दादरमध्ये 93 वर्षांपासून कबूतर खाना आहे. कबूतर खान्याला वेळीच पर्यायी जागा दिली, असती तर जैन समाज एवढा आक्रमक झाला नसता पण त्यांच्या पालकमंत्र्यांना कबूतर खान्यावरून राजकारणच करायचे होते. म्हणूनच आंदोलन भडकवण्यात आले, असा आरोप मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला.

Jain samaj agitation for kabutar khana

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात