विशेष प्रतिनिधी
मुंबई : Parinay Phuke भंडाऱ्यातील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात भाजप नेते परिणय फुके यांनी शिवसेनेचा बाप मीच असे शिवसेनेबाबत बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. दरम्यान फुके यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. फुके यांनी माफी मागावी अन्यथा, शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा या पत्रकार परिषदेमधून शिवसेनेनं फुके यांना दिला गेला होता. आता राज्यभर आरोप प्रत्यारोपांच्या चौफेर फैरी झाल्यानंतर भाजप नेते परिणय फुके यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगीरी व्यक्त केली आहे.Parinay Phuke
दिलगीरी व्यक्त करताना फुके म्हणाले, भारतीय जनता पार्टीच्या भंडारा येथील मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना मी केलेल्या एका विधानामुळे महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा गैरसमज झाला आहे. वास्तविक मला तसे बोलायचे नव्हते. कुणाला दुखविण्याचा माझा हेतू सुद्धा नव्हता. माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे. परंतु, माझ्या विधानामुळे आमच्या मित्र पक्षातील शिवसेनेचे पदाधिकारी- कार्यकर्त्यांच्या भावना दुखवल्या असतील तर त्याबद्दल मी मनापासून सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो.Parinay Phuke
नेमके काय म्हणाले होते परिणय फुके?
माझ्यावर अनेकांनी खापर फोडले. मी काही कोणाच्या आरोपाला उत्तर देत नाहीत. पण त्या दिवशी मला हे माहीत झाले की, कसे असते तुमच्या घरी जर पोराला चांगले मार्क मिळाले, तर कोणाचे कौतुक होते पोरगा किंवा आई. काही चांगले झाले तर कोणी केले आईने केले आणि जर काही खराब झाले तर कोणी केले, बापाने केले. त्या दिवशी मला हे पक्क माहीत झाले की शिवसेनेचाही बाप मीच आहे.
शिंदेसेनेच्या कुंभलकर यांनी दिला होता इशारा
भाजप पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात भाजप आमदार परिणय फुके यांनी शिवसेना पक्षाबाबत वादग्रस्त विधान केले होते. यावरून शिवसेना शिंदे गटाचे लोकसभा प्रमुख संजय कुंभलकर यांनी पत्रकार परिषद घेत फुके यांनी १२ तासांच्या आत त्यांच्या विधानाबद्दल माफी मागावी अन्यथा आम्ही शिवसेना शैलीत त्यांना योग्य उत्तर देऊ,असा इशारा दिला होता. यावेळी ते म्हणाले होते की, शिवसेना पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हेच शिवसेनेचे बाप आहेत.अशा परिस्थितीत कोणीही जबरदस्तीने शिवसेनेचे अवैध बाप बनण्याचा प्रयत्न करू नये. नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत फुके यांनी शिवसेनेचे उमेदवार डॉ.प्रकाश मालगावे यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेस उमेदवाराला सहा मते देण्याचे षड्यंत्र रचले. त्यामुळे मालगावे यांना पराभवाला सामोरे जावे लागले.फुके यांनी शिवसेनेबद्दल अपमानास्पद भाषा वापरून कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा नेत्याला आवरावे,अन्यथा शिवसेनेचा बाप कोण आहे हे आम्ही सांगू, असा इशारा त्यांनी दिला होता.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App