नाशिक : प्रियांका गांधी आणि रोहित पवारांची निवृत्ती सारखेच न्यायाधीशांवरच शिंतोडे उडवी!!, असला प्रकार नेमका आजच समोर आला. खरा भारतीय या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी राहुल गांधींवर ताशेरे मारले. त्यावरून चिडून प्रियांका गांधींनी न्यायमूर्तींवरच शिंतोडे उडविले. नेमका तसाच प्रकार रोहित पवारांनी मुंबईत केला. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींवर बदनामीचे शिंतोडे उडविले. Priyanka Gandhi and Rohit Pawar
राहुल गांधींनी चीनला अनुकूल भूमिका घेऊन भारतीय सैन्यावर सवाल उपस्थित केले. चीनने 2000 वर्ग किलोमीटर भारतीय भूमी बळकावल्याचे खोटे narrative चालविले. म्हणून सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी राहुल गांधींना खडसावले. सच्चा भारतीय असली विधाने कधीच करणार नाही. भारतीय सैन्य दलाचे मनोधैर्य खचवणार नाही, असे ताशेरे ओढले. म्हणून प्रियांका गांधी चिडल्या. खरा आणि खोटा भारतीय ठरविण्याचा अधिकार न्यायमूर्तींना नाही, असे त्या म्हणाल्या. राहुल गांधींनी मोदी सरकारला प्रश्न विचारले म्हणून मोदी सरकारने न्यायमूर्तींकडून राहुल गांधींवर ताशेरे ओढले, असा आरोपही त्यांनी केला. या सगळ्या प्रकारात प्रियांका गांधींनी सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींवर बदनामीचे शिंतोडे उडविले.
– रोहित पवारांचे शिंतोडे
रोहित पवारांनी मुंबईत असाच प्रकार केला. सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजमध्ये मुंबई हायकोर्टात तीन न्यायाधीश नेमले. यामध्ये अजित कडेठाणकर, सुशील घोडेस्वार आणि आरती साठे यांचा समावेश केला. पण न्यायाधीशांच्या यादीत आरती साठे यांचा समावेश झाल्याचे पाहून रोहित पवारांची सटकली. या आरती साठे पूर्वी भाजपच्या प्रवक्त्या होत्या. आता त्यांना हायकोर्टाचे न्यायाधीश नेमले, यावर रोहित पवारांनी आक्षेप घेतला. तशी पोस्ट त्यांनी शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी सत्ता संतुलन, सत्तेचे विकेंद्रीकरण वगैरे जड जड शब्द वापरून ज्ञान पाजळले. पण हे ज्ञान पाजळताना रोहित पवार हे विसरले की आरती साठे यांनी 2024 मध्येच भाजपच्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिलाय. ही वस्तुस्थिती जाणून न घेताच रोहित पवारांनी आरती साठे आणि भाजप यांच्यावर बदनामीचे शिंतोडे उडविले.
भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी वस्तुस्थिती समोर आणली. आरती साठे यांनी 2024 मध्ये भाजपच्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिल्याचे पत्र त्यांनी सोशल मीडिया हँडलवर सादर केले.
या एकूण प्रकारात राजकीय घराण्यांची हीन प्रवृत्ती समोर आली. ती म्हणजे आपल्या अंगावर कुठलेही प्रकरण शेकले, तर त्यातून राजकीय धडा शिकण्याऐवजी थेट न्यायव्यवस्थेला किंवा न्यायमूर्तींनाच जबाबदार धरून ठोकून काढायचे ही राजकीय घराण्यांची हीन प्रवृत्ती प्रियांका गांधी आणि रोहित पवारांनी दाखविली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App