वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Home Minister Shah गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेबाबत उच्चस्तरीय बैठक घेतली. यादरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल, गुप्तचर विभागाचे (आयबी) संचालक तपन कुमार डेका, गृहसचिव गोविंद मोहन उपस्थित होते.Home Minister Shah
तत्पूर्वी, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्याच वेळी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्यासोबत बैठक घेतली.
दिल्लीतील या बैठका जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याच्या ६ वर्षे पूर्ण होण्याच्या एक दिवस आधी झाल्या. बैठकांमध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याची माहिती समोर आलेली नाही. सूत्रानुसार, देशाच्या सध्याच्या सुरक्षा परिस्थितीवर चर्चा झाली आहे.
रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही तासांच्या अंतराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. या भेटींमागील कारणे माहित नाहीत.
राष्ट्रपती भवनाने दुपारी १२:४१ वाजता X वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींना भेटल्याची माहिती दिली होती. सायंकाळी ६:३७ वाजता राष्ट्रपती भवनाने लिहिले की, ‘केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपतींना भेट घेतली.’
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App