Raj Thackeray : युतीसाठी आणखी प्रतीक्षा करा; राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश

Raj Thackeray

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Raj Thackeray  आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या वेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत युती बाबत अद्याप थोडी प्रतीक्षा करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, 20 वर्षांनंतर आम्ही दोघे भाऊ एकत्र येऊ शकतो, तर तुम्ही का भांडता? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी मतभेद मिटवून एकत्र येण्याच्या सूचना सर्वांना केल्या आहेत.Raj Thackeray

या मेळाव्यात राज ठाकरे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत युती बाबत योग्य वेळी सांगेल. युतीचे काय करायचे? ते माझ्यावर सोड. मात्र, आपापसातील मतभेद मिटवा आणि कामाला लागा, अशा सूचना राज ठाकरे यांनी दिल्या आहेत. इतकेच नाही तर मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवा, ते करत असताना हिंदी भाषिकांचा द्वेष करु नका, अशा सूचना देखील त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. कोणालाही न घाबरता आत्मविश्वासाने काम करा. नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त होतील, त्यांना स्वीकारा, असे आवाहन देखील राज ठाकरे यांनी केले आहे. वीस वर्षानंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग तुम्ही का भांडता? असा प्रश्न देखील राज ठाकरे यांनी विचारला आहे. मुंबई महानगर पालिका निवडणुकीत मनसे 100 टक्के सत्तेत येणार असल्याचा दावा देखील राज ठाकरे यांनी केला.Raj Thackeray



मुंबई महानगर पालिकेवर मनसेचीच सत्ता

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाची मानली जाणारी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी कामाला लागण्याच्या सूचना राज ठाकरे यांनी दिल्या आहेत. तसेच मुंबई महानगर पालिकेवरील सत्तेत मनसे देखील सहभागी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यासाठीच मराठीचा मुद्दा घरोघरी पोहोचवण्याच्या सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत.

संघटनेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या सूचना – बाळा नांदगावकर

महाराष्ट्र मध्ये आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत. या कारणाने काही महत्त्वाच्या सूचना राज ठाकरे यांनी सर्वच पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. संघटनेच्या दृष्टिकोनातून काय करायला पाहिजे, यासाठी या सूचना होत्या. आगामी निवडणुकीला सामोरे जाण्यासाठीच्या महत्वाच्या सूचना राज ठाकरे यांनी दिल्या असल्याचे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले. या सर्व सूचना राज ठाकरे यांनी हसत खेळत केल्या असल्याचेही नांदगावकर यांनी म्हटले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षासोबत युती संदर्भात राज ठाकरे काही बोलले नाही. मात्र तुम्ही एकमेकांना मानसन्मान दिला पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केल्या असल्याचे बाळा नांदगावकर यांनी सांगितले आहे.

Raj Thackeray’s Orders for MNS Workers: Wait for Alliance, Get to Work

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात