चौथ्या कसोटीत भारताचा रोमांचक विजय; गोलंदाजांची कमाल; इंग्लंडवर 6 धावांनी मात; मालिकेत बरोबरी!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : चौथ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडवर रोमांचक विजय मिळवला. एक दिवसीय सामन्यासारखी चुरस असलेल्या सामन्यात इंग्लंडवर अवघ्या 6 धावांनी मात केली. मोहम्मद सिराजने आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवत इंग्लंडच्या संघाचे शेपूट गुंडाळून टाकले.

ओव्हल कसोटी सुरुवातीपासूनच रोमांचक स्थितीत होती कारण इंग्लंडने नाणेफेक जिंकल्यानंतर भारताला फलंदाजी दिली, पण भारताचा संघ अवघ्या 224 धावांमध्ये गुंडाळला. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडवर त्याचे उट्टे काढले. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडचा पहिला डाव 247 धावांवर गुंडाळला. त्यानंतर भारत यांनी दुसऱ्या डावामध्ये चिवट फलंदाजी करून 396 धावा केल्या आणि इंग्लंड समोर 367 धावांचे आव्हान ठेवले. पण इंग्लंडला ते आव्हान पेलता आले नाही.



इंग्लंडला 6 धावांनी पराभव पत्करावा लागला. मोहम्मद सिराजने इंग्लंडचे शेपूट गुंडाळले. जो रूट आणि एच. ब्रूक यांची शतके इंग्लंडच्या कामी येऊ शकली नाहीत. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्ण यांनी इंग्लंडचा डाव 367 धावांमध्ये गुंडाळला. मोहम्मद सिराजने 5 विकेट घेतल्या, तर प्रसिद्ध कृष्णाने 4 विकेट घेतल्या. तेंडुलकर अँडरसन मालिकेत भारत आणि इंग्लंड यांनी 2 – 2 विजय मिळवून बरोबरी केली.

भारताच्या दुसऱ्या गावामध्ये फलंदाजांपेक्षा गोलंदाजांनी चांगली फलंदाजी आणि नंतर चांगली गोलंदाजी केली. त्यामुळे हा विजय गोलंदाजांच्या नावावर नोंदविला गेला. रवींद्र जडेजा वॉशिंग्टन सुंदर यांनी चांगली फलंदाजी करून भारताच्या डावाला 396 पर्यंत पोहोचविले. त्यांना जोरेलने पण साथ दिली होती. याच 396 धावांचा फायदा नंतर मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्ण या गोलंदाजांना झाला. एक दिवसीय सामन्यासारखी चुरस निर्माण झालेल्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड वर रोमांचक विजय मिळवला.

India’s thrilling victory in the fourth Test

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात