विशेष प्रतिनिधी
पुणे : भाेंगे वाजविण्याची परवानगी काेणालाही नाही. मात्र, काही माफिया धर्माच्या नावावर भाेंगे वाजवित हाेते. पुढील तीन महिन्यांत महाराष्ट्र भाेंगेमुक्त हाेणार आहे. प्रार्थस्थळावरील भाेंगे हटविण्याबाबत जसे काम मुंबई आणि ठाण्यात झाले आहे तसे काम पुण्यातही व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी पुण्यातील पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मशीदींवरील भाेंगे हटविण्याची मागणी केली. Kirit Somayya
मुंबई उच्च न्यायालय आणि मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार भोंगेमुक्त मोहिमेची अंमलबजावणी संपूर्ण राज्यभर करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यातील यंत्रणेला सक्रिय करण्यासाठी सोमय्या पुण्यात आले हाेते. ते म्हणाले, मुंबई आणि ठाण्यात जशी अंमलबजावणी झाली, तशीच पुण्यातही व्हावी यासाठी मी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना आणि सर्व पोलीस ठाण्यांना पत्र पाठवले आहे. पुण्यातील एका भागात १४ मशिदी असून तिथे मोठ्या प्रमाणावर भोंगे लावण्यात आले आहेत.
दिवसातून पाच वेळा नमाज पठणासाठी मोठ्या आवाजात भोंगे वाजवले जातात. यामुळे ध्वनी प्रदूषण होते आणि कायद्याचा भंग होतो. ध्वनी प्रदूषण कायदा सर्वांसाठी समान आहे. काही राजकीय नेते केवळ मशिदींवर भोंगे लावून दादागिरी करत आहेत. गेली २४ वर्ष ही दादागिरी सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी कारवाई सुरू आहे पण अजूनही काही ठिकाणी अंमलबजावणीत अडथळे आहेत.
संभाजीनगरात सध्या ७० टक्के भोंगे उतरवण्यात आल्याचे सांगून साेमय्या म्हणाले, अनेक मंदिरांमधूनही भोंगे खाली घेतले गेले आहेत आणि डीजे वाजवण्यावरही हळूहळू कायद्याप्रमाणे निर्बंध आणले जात आहेत. हा विषय राजकीय नाही, तर कायद्याच्या अंमलबजावणीचा आहे. मी स्वतः ही जबाबदारी घेतली असून संपूर्ण राज्यभर फिरत आहे. विधानसभेतही अनेक आमदारांनी या विषयावर आवाज उठवला आहे. पुणे पोलिसांनी मुंबईसारखा आदर्श ठेवावा अशी अपेक्षा सोमय्यांनी व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App