विशेष प्रतिनिधी
मुंबई : CM Fadnavis काँग्रेस पक्षाच्या खासदार प्रणिती शिंदे ऑपरेशन सिंदूरला सरकारचा तमाशा असे संबोधले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला. ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणजे हा सेनेचा अपमान करण्यासारखे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. असे विधान करणाऱ्यांचा मी निषेध करतो. या प्रवृत्तीचा मी धिक्कार करतो, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी प्रणिती शिंदेंवर केला.CM Fadnavis
सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांनी आपल्या दोन मुलांसह आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी अण्णासाहेब डांगे यांचे असंख्य कार्यकर्तेही भाजपमध्ये सामील झाले आहे. या पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्याचा निषेध केला.CM Fadnavis
नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
प्रणिती शिंदेंनी केले विधान सेनेचा अपमान करण्यासारखा आहे. त्यामुळे मला असे वाटते की जर सेनेचा अपमान करणारे या देशामध्ये नेते असतील, तर निश्चितपणे अशांच्यासमोर प्रश्न चिन्ह लागणे हे स्वाभाविक आहे, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर हल्ला चढवला. काल पंतप्रधान मोदींनी सांगितले की, कदाचित बोलणारे नवीन आहेत. म्हणून त्यांच्या तोंडून आपल्याला जे बोलता येत नाही, ते त्यांच्या मुखातून बोलून घेत आहेत. अशी शंका पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे. ती योग्य वाटते, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. ऑपरेशन सिंदूर म्हणजे तमाशा होता असे विधान करणाऱ्यांचा मी निषेध करतो. या प्रवृत्तीचा मी धिक्कार करतो, असा घणाघात मुख्यमंत्र्यांनी केला.
काल पंतप्रधानांनी काँग्रेसला उघडे पाडले आहे. जी भाषा पाकिस्तान बोलतोय, तीच भाषा काँग्रेस बोलत आहे. हे पंतप्रधानांनी आपल्यासमोर स्पष्ट केले आहे. रक्षामंत्री आणि विदेश मंत्र्यांनीही कशा प्रकारे आपली विदेश नीती राहिली? याबाबत सांगितले. जगातील 193 देशांपैकी फक्त 3 देशांनी पाकिस्तानला समर्थन दिले. पाकिस्तान आपले काही वाकडे करू शकला नाही. मात्र, भारताने पाकिस्तानच्या एअर फिल्ड कशा नष्ट केल्या, हे सगळे पुराव्यानिशी सांगितले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
वादग्रस्त मंत्र्यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांचे मौन
काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या मंत्र्यांना तुम्ही सुनावलेत का? असा सवाल माध्यम प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केला असता, मंत्रिमंडळात आपण जे बोलतो, ते बाहेर सांगायचे नसते, असे वाक्यात उत्तर देत त्या प्रकरणावर बोलणे टाळले.
अण्णासाहेब डांगे 23 वर्षांनी भाजपमध्ये परतले
सांगलीतील ज्येष्ठ धनगर नेते आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे समर्थक माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी अण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र चिमण डांगे आणि विश्वनाथ डांगे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबई हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. आरएसएसच्या मुशीत तयार झालेले आणि शिवसेना-भाजप युतीमध्ये मंत्री राहिलेले अण्णासाहेब डांगे हे 23 वर्षांनी स्वगृही परतले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App