जयशंकर राज्यसभेत म्हणाले, विरोधकांनी कान खोलून ऐकावे, ट्रम्पचा मोदींना एकही फोन कॉल नाही; तरी संसदेबाहेर राहुल गांधींची जुनीच रेकॉर्ड!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर राज्यसभेत म्हणाले, विरोधकांनी कान खोलून ऐकावे, अमेरिकेचे अध्यक्ष 2018 यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना 22 एप्रिल ते 16 जून या काळात एकही फोन कॉल आला नाही!!

एवढ्या स्पष्ट शब्दांमध्ये भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अमेरिकेला आणि भारतातल्या विरोधकांना सुनावले तरी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी संसदेबाहेर आज जुनीच रेकॉर्ड लावली. ट्रम्प खोटं बोलता येत हे सांगण्याची हिंमत मोदींमध्ये नाही, असा दावा त्यांनी केला.

ऑपरेशन सिंदूरवरच्या चर्चेत जयशंकर यांनी राज्यसभेत भाग घेतला आपल्या भाषणादरम्यान त्यांनी सिंधू जलकराराची चिरफाड केली. भारतातल्या त्या वेळच्या राज्यकर्त्यांना भारताच्या जम्मू-काश्मीरची चिंता नव्हती, तर पाकिस्तानातल्या पंजाबची चिंता होती म्हणून त्यांनी भारतात उगम पावणाऱ्या नद्यांच्या पाण्यावरचे हक्क सोडून दिले. ते पाकिस्तान सारख्या शत्रू राष्ट्राला बहाल केले देशातल्या नागरिकांची चिंता करायचे सोडून परकीय शत्रूची चिंता करणारा सिंधू जल करार हा जगातला एकमेव करार आहे, असा टोला त्यांनी हाणला. आधीच्या सरकारांनी केलेल्या सगळ्या चुका पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने सुधारल्या 370 कलम हटवले सिंधू जल करार स्थगित केला, याची आठवण त्यांनी विरोधकांना करून दिली.

त्याचवेळी जयशंकर यांनी विरोधकांनी कान उघडून ऐकावे, 22 एप्रिल ते 16 जून या कालावधीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना एकही फोन कॉल आला नाही, असे सुनावले‌.

मात्र संसदेबाहेर राहुल गांधींनी कालचीच रेकॉर्ड पुन्हा लावली. डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलतायत हे सांगण्याची मोदींमध्ये हिंमत नाही. भारताला मुक्त व्यापार करारात दाबण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प सगळं बोलतात, पण मोदी त्यांना उत्तर देत नाहीत. ते उत्तर देऊ पण शकत नाहीत, असा आरोप राहुल गांधींनी केला.

S Jaishankar trashed trump’s claims, but Rahul Gandhi repeats the record

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात