विशेष प्रतिनिधी
बीड : Mahadev Munde परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांचा 21 महिन्यांपूर्वी अत्यंत निर्घृण पद्धतीने खून करण्यात आला होता. या घटनेला 21 महिन्यांचा काळ लोटला तरी देखील मुंडे कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी अनेकवेळा न्याय मिळवा यासाठी प्रयत्न केले. परंतु, बीडमधील पोलिसांनी देखील याची हवी तशी दखल घेतली नाही. अखेर आता मुख्यमंत्र्यांनी मुंडे कुटुंबाला गुरुवारी (31 जुलै) मुंबईत बोलावले आहे.Mahadev Munde
महादेव मुंडे यांचे कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी मुंबईत भेट घेणार असून सर्व कैफियत मांडणार आहेत. आज सायंकाळीच मुंडे कुटुंब मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींना फोन करून या प्रकरणी लक्ष देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता उद्या मुंडे कुटुंबीय मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत.Mahadev Munde
ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीड पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर भर पावसात परळीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्यात आता मंगळवारी रात्री शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी मुंडे कुटुंबाने सगळी माहिती रोहित पवारांना सांगितली होती.
महादेव मुंडे यांचा खून बारा गुंठे जमीनिसाठी झाला. ती जमीन वाल्मीक कराडला घ्यायची होती. श्री कराड हा वाल्मीक कराडचा मुलगा आहे, असे मला कळले. जमिनीचा वाद वाढत गेला आणि पुढे या प्रकरणातून महादेव मुंडे यांचा खून करण्यात आला, अशी माहिती ज्ञानेश्वरी मुंडे यांनी रोहित पवारांना दिली.
वाल्मीक कराड यांची दोन मुले आणि गोट्या गित्ते यांनी मिळून महादेव मुंडेंचा खून केला. पोस्टमार्टेम अहवालानुसार, त्यांच्या गळ्याजवळील मांसाचा तुकडा काढण्यात आला होता, हे विशेषतः धक्कादायक बाब आहे. मंगळवारी आमदार रोहित पवार यांनी परळी येथे महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि संपूर्ण प्रकरणाची सखोल माहिती जाणून घेतली. नंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत हा संपूर्ण प्रकार अत्यंत दु:खद आणि निंदनीय असल्याचे सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App