विशेष प्रतिनिधी
मुंबई : पुण्यात रेव्ह पार्टी प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक झाली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या नेत्यांवर सातत्याने टीका करणाऱ्या एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना मोठा धक्का बसला. या घटनेमुळे खडसे कुटुंबाची कोंडी झाली. भाजप समर्थकांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्षा आणि विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी या प्रकरणावरून रोहिणी खडसे आणि सुप्रिया सुळे यांना लक्ष्य केले.
गेल्या 70 वर्षांमध्ये झाली नाही, एवढी गेल्या 150 दिवसांमध्ये महाराष्ट्राची बदनामी झाली, असा आव सुप्रिया सुळे यांनी आणला होता. पण आता त्यांच्याच पक्षातल्या मोठ्या नेत्याच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक झाल्यानंतर सुप्रिया सुळे मूग गिळून गप्प बसल्यात. त्यावरच चित्रा वाघ नेमके बोट ठेवले.
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे हे भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर सातत्याने टीका करत होते, तर रोहिणी खडसेही विविध मुद्द्यांवरून महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवताना दिसत होत्या. मात्र, आता प्रांजल खेवलकर यांच्या अटकेने त्यांच्यावर टीकेची धनी होण्याची वेळ आली आहे.
चित्रा वाघ यांची पोस्ट काय?
ओऽऽऽऽऽ१२मतीच्या मोठ्ठया ताई… @supriya_sule तुमच्या तर दिव्याखालीचं अंधार होऽऽऽ
तुमच्या वाजंत्रीताई महाराष्ट्रात ड्रग्स येतात कुठून हा प्रश्न सरकारला विचारतात त्याआधी त्यांनी स्वत:च्या नवऱ्याला प्रांजल खेवलकरना हा प्रश्न विचारायला हवा… महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटनेत सरकारला जबाबदार धरणाऱ्या आमच्या नावाने कायम तुतारी वाजवणाऱ्या वाजंत्री ताईंनी आधी स्वत:च्या घराकडे लक्ष द्यावे… आणि हो…..तुमचा नवरा लहान नाही कि त्याला कोणी उचलून आणून रेव्हपार्टीत बसवेल नाही तर यात ही पुन्हा सरकारलाच जबाबदार धराल… राज्यात जेव्हापासून देवाभाऊंचे भाजपा-महायुतीचे सरकार आलयं तेव्हापासून ड्रग्सची प्रकरणे बाहेर येत आहेत. आधी ती बेमालूमपणे का लपवली जायची कोण लपवायचे याचे गूढ इथेच कुठेतरी दडलं आहे असं की काय असा प्रश्न महाराष्ट्राला पडतोय आणि गुन्हे उघड झाल्यावर वाजंत्रीताई चोराच्या उलट्या बोंबा मारायला पुढे येतात हेही गुपित उघड झालं…
पुण्यातील खराडी परिसरातील एका उच्चभ्रू वसाहतीतील फ्लॅटमध्ये शनिवारी (२६ जुलै) रात्री उशिरा सुरू असलेली रेव्ह पार्टी पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उधळून लावली. या कारवाईत चार पुरुष आणि दोन महिलांना अटक करण्यात आली असून, अटक झालेल्यांमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर यांचाही समावेश असल्याचे उघड झाले. ही घटना समोर आल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली. याप्रकरणी राजकीय घडामोडी अधिकच गडद होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर “प्रांजल खेवलकर नक्की कोण?” याचीही चर्चा रंगू लागली.
शहरातील खराडी परिसरात एका उच्चभ्रू गेस्ट हाऊसवर सुरू असलेल्या हाय-प्रोफाईल रेव्ह पार्टीवर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकत पाच जणांना अटक केली. ‘स्टे बर्ड’ नावाच्या गेस्ट हाऊसमध्ये सुरू असलेल्या या पार्टीदरम्यान, पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ, दारू आणि हुक्के जप्त केले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन महिला, तीन पुरुषांचा समावेश असून, एकनाथ खडसेंच्या जावयाचा आणि बुकी निखिल पोपटाचा समावेश आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App