विशेष प्रतिनिधी
मुंबई : Uddhav Thackeray उद्धव ठाकरेंचे अनेक आमदार आणि खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. केवळ तांत्रिक कारणांमुळे ते ठाकरे गटात असल्याचेही गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.Uddhav Thackeray
राज्यात एकीकडे मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची चर्चा सुरू असताना गिरीश महाजन यांनी केलेल्या खळबळजनक दाव्याने राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा सुरू झाली असून, ठाकरे गट पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर आहे का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. मंत्री गरीश महाजन आज पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी सकाळी महाजन यांनी विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना उपरोक्त दावा केला आहे.Uddhav Thackeray
नेमके काय म्हणाले गिरीश महाजन?
काँग्रेससह सर्वच पक्षांचे लोक भाजपमध्ये यायला तयार आहेत. विशेषतः ठाकरे गटाचे अनेक आमदार आणि खासदार भाजपच्या संपर्कात आहेत. पण काही तांत्रिक कारणांमुळे ते अजूनही ठाकरे गटातच आहेत. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी ठाकरे गटातील अनेकजण भाजपात आल्याचे दिसतील, असे गिरीश महाजन यांनी म्हटले.
संजय राऊत यांना कोण विचारते?
राज्यातील मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेबाबत गिरीश महाजन यांना विचारले असता, त्यांनी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही जोरदार शब्दांत टीका केली. “संजय राऊत हे सगळे मंत्रिमंडळ हटवायला बसले आहेत. त्यांना वाटत यांचे मंत्रिमंडळ जावे आणि आमचे मंत्रिमंडळ यावे. संजय राऊत यांना कोण विचारते? असा सवाल करत, वायफळ बडबड करायची, खोटे बोलून रेटून न्यायचे हा संजय राऊत यांचा धंदा झाला असल्याची टीका गिरीश महाजन यांनी केली.
हॅनी ट्रॅप विषय माझ्यासाठी संपला
दरम्यान, काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेल्या हनी ट्रॅप प्रकरणावरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. “हा विषय माझ्यासाठी आता संपला आहे,” असे सांगून त्यांनी यावर पुढे बोलण्यास नकार दिला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App