वृत्तसंस्था
पाटणा : Bihar Election Commission बिहारच्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा (एसआयआर) पहिला टप्पा शुक्रवारी पूर्ण झाला. आतापर्यंत २२ लाख मृत आणि ७ लाख डुप्लिकेट मतदारांची ओळख पटली आहे, असे निवडणूक आयोगाने सांगितले. त्याच वेळी २४ जूनपासून ३५ लाख मतदार कायमचे स्थलांतरित झाले आहेत किंवा त्यांचा ठावठिकाणा कळलेला नाही. आयोगाने ६४ लाख मतदारांची स्वतंत्र यादी तयार केली आहे. अशा परिस्थितीत एकूण ६४ लाख नावे मतदार मसुदा यादीतून बाहेर पडतील. निवडणूक आयोगाचे उपसंचालक पी. पवन म्हणाले, राज्यात एकूण ७ कोटी ८९ लाख ६९ हजार ८४४ मतदार आहेत. यापैकी ७ कोटी २३ लाखांनी मतमोजणी अर्ज सादर केले आहेत.Bihar Election Commission
१ ऑगस्ट रोजी प्रकाशित होणाऱ्या मसुदा यादीत त्यांची नावे दिसतील. बिहारमधील ९९.८% मतदारांना समाविष्ट केले. त्यांचे डिजिटायझेशनचे काम पूर्ण झाले. १.२ लाख मतदारांचे मोजणी अर्ज सापडले नाहीत. फॉर्म जमा करण्याची अंतिम तारीख २६ जुलै आहे. फॉर्म भरलेले नसलेल्या किंवा मृत्युमुखी पडलेल्या आणि कायमचे स्थलांतरित झालेल्या मतदारांची यादी २० जुलै रोजी १२ पक्षांना शेअर करण्यात आली आहे, जेणेकरून १ ऑगस्ट रोजी प्रकाशित होणाऱ्या मसुदा यादीत त्रुटी दुरुस्त होईल. १ ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान चूक असल्यास आक्षेप नोंदवता येतील.
पावसाळी अधिवेशनात आठवडाभर गदारोळ
बिहारमधील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकन (एसआयआर) व ऑपरेशन सिंदूरसह अनेक मुद्द्यांवर विरोधकांचा गोंधळ शुक्रवारीही सुटला नाही. तहकूबींनंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब केले. परंतु लोकसभा-राज्यसभेच्या कामकाज सल्लागार समित्यांमधील एकमतानुसार सभागृहे सोमवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, पाच दिवसानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विविध पक्षांसोबत चर्चा केली.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की, आयोगाने भीतीपोटी, मृत, कायमचे स्थलांतरित, बनावट/परदेशी मतदारांच्या नावे बोगस मतदानाचा मार्ग आधी बिहारमध्ये आणि नंतर संपूर्ण देशात मोकळा करावा का? हे घटनेच्या विरुद्ध असेल. शुद्ध मतदार यादी ही निष्पक्ष निवडणुका आणि मजबूत लोकशाहीचा पाया आहे.
बिहारमधील यादी सुधारणांविरोधात विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसद परिसरात निषेध केला. अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व खासदारांनी एसआयआर पोस्टर्स फाडून कचऱ्यात टाकले
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App