विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sanjay Shirsat राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याच्या चर्चां सध्या सुरू आहेत. , आठ मंत्र्यांना डच्चू दिला जाईल, असे या सामना या शिवसेना ठाकरे गटाच्या मुखपत्रात म्हटले आहे. यामध्ये सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे नावही घेतले गेले आहे. सामनामध्ये बातमी आली म्हणजे काहीतरी होणार असा अर्थ कधीच होत नाही, असा टोला शिरसाट यांनी लगावला आहे.Sanjay Shirsat
विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी होत असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, माझ्या राजीनाम्याबाबत जी बातम्या पसरवल्या जात आहेत, त्यात काहीही तथ्य नाही. संबंधित मंत्र्यांशी प्रत्येक नेत्याचा आधीच संवाद होतो. त्यामुळे आम्ही अशा आरोपांकडे गांभीर्याने पाहत नाही.”Sanjay Shirsat
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याशी सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिरसाट म्हणाले, “माझा उद्देश अगदी स्पष्ट आहे. काही विशिष्ट विषय हे केवळ कॅबिनेट मंत्र्यांच्या अधिकारात येतात. अशावेळी निर्णय प्रक्रियेत गोंधळ नको म्हणून मी सहकार्यातून सूचना केली की, बैठक घेणार असाल तर मला आधी कल्पना द्या. पुन्हा पुन्हा फाईल फिरवण्याची गरज नको. मी पत्रव्यवहार करण्यापेक्षा थेट सूचना देतो. त्यांनी त्यावर उत्तर दिले, पण त्यातून काही वाद निर्माण झाला असं समजण्याचं कारण नाही.”
“महायुतीत दरी पडली आहे असं समजण्यास काहीही कारण नाही,” असेही त्यांनी सांगितले. “मुख्यमंत्री कार्यालयाशी प्रत्येक मुद्द्यावर सुसंवाद आहे. माझ्याकडून कुठलीही अडथळा नाही.”
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकारमधील मंत्र्यांचे फोन टॅप होत असल्याचा दावा केला होता. यावर शिरसाट म्हणाले की, रोहित पवार यांना काय करायचं आहे? आमचे फोन टॅप होतायत की नाही ते आम्ही पाहू. आमचं सरकार आहे, आम्ही सत्तेत आहोत, मग फोन टॅपिंग कशासाठी? रोहित पवार यांनी कोणताही आधार नसलेल्या गोष्टी बोलल्या आहेत. सत्ताधाऱ्यांमध्ये अस्थिरता निर्माण व्हावी म्हणूनच त्यांनी हे वक्तव्य केलं. पण आम्ही अशा निराधार आरोपांकडे लक्ष देत नाही. आमचं सरकार प्रगतीच्या दिशेने काम करत आहे.”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App