विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ajit Pawar राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरील ऑनलाईन रमी प्रकरणी लवकरच कडक कारवाई होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. विधानभवनात पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, याआधीही त्यांनी कोकाटेंना योग्य इशारा दिला होता की ‘इजा-बिजा झाली, तिजा होऊ देऊ नका’. मात्र आता पुन्हा एकदा प्रकरण घडल्याने गंभीर दखल घेण्याची वेळ आली आहे.Ajit Pawar
ते म्हणाले की, माणिकराव कोकाटे यांनी माध्यमांसमोर आपण खेळत नसल्याचे सांगितले आहे. पण अजून ते समोरासमोर भेटलेले नाहीत. सोमवारी किंवा मंगळवारी त्यांच्या भेटीची शक्यता आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून योग्य ती कारवाई केली जाईल.Ajit Pawar
त्याचबरोबर ते म्हणाले की, मंत्रिपदावर असलेल्या कोणत्याही व्यक्तीने वागणूक देताना आणि बोलताना तारतम्य ठेवले पाहिजे. कोकाटे यांनी सरकारला “भिकारी” म्हणाल्याच्या मुद्यावरही ते म्हणाले की, त्याबद्दलही थेट विचारणा केली जाईल. सरकारची प्रतिष्ठा कायम राखण्याची जबाबदारी सर्व मंत्र्यांची आहे, हे त्यांनी अधोरेखित केले.Ajit Pawar
“पुरावे द्या, चौकशी करू” – हनी ट्रॅप प्रकरणावर सुस्पष्ट भूमिका
हनी ट्रॅप संदर्भात विरोधकांकडून सतत व्हिडिओ आणि पेनड्राईव्ह असल्याचा दावा केला जातो. यावर अजित पवार म्हणाले की, “फक्त आरोप करायचे थांबवा, काय आहे ते बाहेर काढा. पुरावे आहेत तर द्या. चौकशी करू.”
या प्रकरणी कोणीही दोषी असेल, तर त्याच्यावर कारवाई केली जाईलच, पण पुरावे आधी समोर यावेत, असे त्यांनी ठामपणे सांगितले. पुण्यात या संदर्भात एफआयआर दाखल झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.
अजित पवार यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही प्रकरणात सत्ताधाऱ्यांनी सरकारची बदनामी होईल असे वर्तन करू नये. कोण काय बोलतो यापेक्षा, आपण काय करतो हे महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले. सरकारच्या प्रतिमेची जबाबदारी सर्व मंत्र्यांची आहे आणि त्यासाठी वर्तनात स्वअनुशासन हवे, असा सल्लाही त्यांनी दिला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App