नाशिक : अर्बनवाद्यांच्या हातात मराठीचे फलक; पण JNU मधल्या मराठी अध्यासनाला विरोध!!, असला प्रकार दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात आज घडला. अर्बन नक्षलवाद्यांचे समर्थन करणाऱ्या स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात SFI च्या विद्यार्थ्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मराठी अध्यासन केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात गोंधळ घालायचा प्रयत्न केला. केरळमध्ये राज्यपालांच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रकार SFI च्या विद्यार्थ्यांनी दिल्लीत रिपीट करायचा प्रयत्न केला. urban Naxalites
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन त्याचबरोबर कवी कुसुमाग्रज मराठी अध्ययन अध्यासन यांची उद्घाटने झाली. या उद्घाटन समारंभाला देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार म्हणून स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या SFI विद्यार्थ्यांनी विरोध केला. त्यासाठी त्यांनी फलकांवर महाराष्ट्रातल्या हिंदी सक्तीचा मुद्दा लिहिला होता. प्रत्यक्षात या विद्यार्थ्यांचा महाराष्ट्रात मंजूर झालेल्या जनसुरक्षा कायद्याला विरोध होता. महाराष्ट्रातला दोन्ही स्वरूपातला नक्षलवाद संपवण्यासाठी फडणवीस सरकारने जनसुरक्षा कायदा विधिमंडळात मंजूर करून घेतला. या कायद्याला विरोध करण्यासाठी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या विद्यार्थ्यांनी निदर्शने केली, पण त्यासाठी त्यांनी हिंदी सक्तीला विरोध असल्याचा बागुलबुवा उभा केला.
प्रत्यक्षात त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सुरू केलेल्या संरक्षण आणि सामरिक अभ्यास केंद्राला विरोध केला. त्याचबरोबर कुसुमाग्रजांच्या नावाने सुरू झालेल्या मराठी अध्ययन केंद्राला विरोध केला. मात्र या निदर्शनांचा विरोध झुगारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही अध्यासन केंद्रांचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला त्यांच्यासमवेत राज्याचे मंत्री उदय सामंत आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी पंडित उपस्थित होत्या.
केरळमध्येही SFI चा विरोध
स्टुडन्ट फेडरेशन ऑफ इंडिया SFI च्या विद्यार्थ्यांनी काही दिवसांपासून केरळचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांना देखील असाच विरोध सुरू केला. सार्वजनिक कार्यक्रमात सरस्वती पूजन नको. भारत माता पूजन नको, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली. त्यासाठी ते राज्यघटनेच्या आड लपले. भारत माता पूजनाचा राज्यघटनेत असा कुठलाही उल्लेख नाही. त्यामुळे भारत माता पूजन सरकारी कार्यक्रमात नको, असा डाव त्यांनी राज्यपालांवर टाकला. मात्र राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी SFI आणि केरळ मधल्या कम्युनिस्ट सरकारचा विरोध डावलून आपल्या अधिकार कक्षेत हे राष्ट्रीय स्वरूपाचे कार्यक्रम जसेच्या तसे सुरू ठेवले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App