भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराचा भारताला फायदा काय??

India-UK

नाशिक : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्रिटन दौऱ्यात आज भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन्ही देशांमध्ये या मुक्त व्यापार करारामुळे भारत आणि ब्रिटन या दोन्ही देशांचा विशिष्ट फायदा होणे अपेक्षित आहे त्यामध्ये भारताला नेमका काय फायदा होईल?, यासंदर्भातला स्पष्ट खुलासा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी ट्विटर द्वारे केला. त्यांनी त्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांचा विशेषत्वाने उल्लेख केला, पण त्या पलीकडे जाऊन भारतीय निर्यातदारांच्या आत्मविश्वास वाढीसाठी हा मुक्त व्यापार करार उपयुक्त ठरणार आहे. India-UK

भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या मुक्त व्यापार करारानुसार, भारत आणि ब्रिटन यांच्यातला सध्याचा 56 बिलियन डॉलर्स चा व्यापार 2030 पर्यंत दुप्पट म्हणजे 112 बिलियन डॉलर्स पर्यंत पोहोचेल. यामुळे भारताचा सर्वाधिक फायदा भारतीय निर्यातदारांना होणार असून भारताच्या 99% वस्तूंवर ब्रिटनमध्ये 0 % कर लागेल. त्यामुळे ब्रिटनमध्ये भारतीय वस्तूंची निर्यात वाढवून त्या अधिक स्वस्त होतील.

75000 भारतीय प्रोफेशनलना इथून पुढे ब्रिटनमध्ये तीन वर्षांचे सिक्युरिटी पेमेंट अदा करावे लागणार नाही.

भारतातल्या छोट्या उद्योजकांनी बनविलेल्या वस्तूंना जागतिक पातळीवर ओळख तर मिळेलच, पण त्याचबरोबर त्यांचे ग्लोबल इंडेक्सिंग आणि जीआय ओळखही निश्चित स्वीकारले जाईल.

भारताचा ब्रिटनला होणारा लेदर आणि फुटवेअरचा व्यापार 900 मिलियन डॉलर्सच्या पलीकडे जाईल. याचा लाभ तिरुपूर, कानपूर इथल्या व्यवसायिकांना होईल. भारताच्या वस्त्रोद्योगाला मुक्त व्यापारातून चालना मिळेल. त्याचबरोबर जेम्स ज्वेलरी, सी फुड, अभियांत्रिकी उत्पादने यांचीही ब्रिटनमध्ये मुक्त विक्री होऊ शकेल.

भारतातल्या कृषी उत्पादकांसाठी ब्रिटनमधली तब्बल 37.5 बिलियन डॉलर्सची व्यापार पेठ खुली होईल. भारतातली ऑरगॅनिक कृषी उत्पादने, तेलबिया उत्पादने, डेअरी उत्पादने, समुद्री उत्पादने तृणधान्य, सफरचंद ब्रिटनच्या बाजारात मुक्तपणे विकली जाऊ शकतील. ज्यांच्यावर कर लादला जाणार नाही.

भारतातल्या यंग प्रोफेशनल्सना या मुक्त व्यापार कराराचा मोठा लाभ होणार असून भारतातले 1800 पेक्षा जास्त शेफ, योगशिक्षक, संगीतकार, कलाकार हे ब्रिटनमध्ये दरवर्षी मुक्तपणे काम करू शकतील.

ब्रिटनमध्ये कार्यालय न थाटता देखील भारतातले प्रोफेशनल किमान इथे 24 महिने म्हणजे दोन वर्षे काम करू शकतील.

36 सर्व्हिस सेक्टर्स मध्ये काम करण्यासाठी इथून पुढे ब्रिटन मधली जाचक आर्थिक चाचणी भारतीयांना पार करावी लागणार नाही.

ब्रिटनमध्ये उत्पादित होणाऱ्या वैद्यकीय उपकरणांना भारतीय बाजारपेठ खुली होईल त्याचबरोबर ही उत्पादने अधिक स्वस्त भारतात मिळू शकतील.

– आता एकतर्फी कर नाहीत

भारतीय उत्पादनांच्या गुणवत्तेविषयी पाश्चात्य जगात विशेषतः ब्रिटनमध्ये कायमच शंका घेतली जायची. भारतीय उत्पादनांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण करून ब्रिटनने कायम एकतर्फी कर लागणी केली होती, पण भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या मुक्त व्यापार करारानंतर कुठलीही खुसपटी कारणे सांगून ब्रिटनला आता कुठलेच कर एकतर्फी लादता येणार नाहीत. याचा लाभ भारतीय निर्यातदारांना लेव्हल प्लेइंग फिल्ड सारखा मिळेल.

What are the benefits of the India-UK free trade agreement for India?

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात