Rohit Pawar : रोहित पवारांचा आरोप- कलाकेंद्रात आमदाराच्या भावाचा गोळीबार; पोलिसांचा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न

Rohit Pawar

विशेष प्रतिनिधी

पुणे : Rohit Pawar पुणे जिल्ह्यातील दौड येथील एका कलाकेंद्रात सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराच्या भावाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेला वाचा फोडली आहे. या घटनेत एक तरुणी जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी हा अंदाधुंद गोळीबार करणारा कोण? हे शोधण्याची गरज आहे. पण ते हे प्रकरणच दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, असे ते म्हणालेत.Rohit Pawar

सत्ताधारी महायुतीमधील घटकपक्षांचे नेते गत काही दिवसांपासून सातत्याने वादात सापडत आहेत. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात पत्ते खेळण्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सरकारची सर्वत्र छी थू होत असताना आता रोहित पवार यांनी सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराच्या भावाने चक्क कलाकेंद्रात गोळीबार केल्याचा आरोप केला आहे. दौंडमध्ये एका कलाकेंद्रात पुणे जिल्ह्यातील एका सत्ताधारी आमदाराच्या भावाने गोळीबार करत राडा केला. या घटनेत एक तरुणी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. अंदाधुंद गोळीबार करणारे हे कोण महाशय आहेत? हे शोधण्याऐवजी पोलिस यंत्रणा सत्ताधारी दबावामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर येत आहे.Rohit Pawar



दोषींवर कारवाई होणार आहे की नाही? की सत्ताधारी आहेत म्हणून मोकाट सोडणार? हा कसला ‘सत्तेचा तमाशा?’ कोणत्याही दबावाला बळी न पडता कायदा व सुव्यवस्थेत अनंत कटकटी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी रोहित पवार यांनी आपल्या एका पोस्टमध्ये केली आहे. रोहित पवार यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियात कलाकेंद्रात धुडगूस घालणारा आरोपी कोणत्या आमदाराचा भाऊ आहे? याविषयी विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. विशेषतः या घटनेत एक तरुणी जखमी झाल्यामुळे पोलिसांनी संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही केली जात आहे.

आवडीची लावणी सादर करण्यावरून वाद

यासंबंधीच्या माहितीनुसार, दौंडच्या चौफुला परिसरात 3 कलाकेंद्र आहेत. गाणी, नृत्य, लावणी अशा विविध कला इथे सादर केल्या जातात. सोमवारी रात्रीही नेहमीप्रमाणे इथे मनोरंजनाचे कार्यक्रम सुरू होते. पण तिथे आलेल्या दोन गटांत आवडीची लावणी सादर करण्यावरून बाचाबाची झाली. त्यातूनच हा गोळीबार झाल्याचा दावा केला जात आहे. मंगळवारी ही बातमी वाऱ्यासारखी सोशल मीडियात पसरली. त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. त्यात तिन्ही कलाकेंद्र चालकांनी असा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा केला. त्यानंतर पोलिसांनी तिन्ही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज जप्त करून तपास सुरू केला.

स्थानिकांच्या माहितीनुसार, या कलाकेंद्रांमध्ये कलेच्या नावाखाली अनेक विभत्स प्रकार सुरू असतात. मद्यपान करून रात्री – अपरात्री राजरोसपणे धिंगाणा सुरू असतो. राजकीय पक्षांचे पुढारी, गुन्हेगार, उद्योजक आदी विविध क्षेत्रातील बडी आसामी इथे येतात. पण पोलिस त्याकडे सर्रास दुर्लक्ष करतात.

माणिकराव कोकाटेंवरही चढवला हल्ला

उल्लेखनीय बाब म्हणजे रोहित पवार यांनी अन्य एका ट्विटद्वारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर निशाणा साधला आहे. CID, CBI एवढंच काय इंटरपोलच्या माध्यमातून चौकशी केली तरी सभागृहात महत्वाची चर्चा सुरु असताना कृषिमंत्री पत्ते खेळत होते, हे सत्य बदलणार नाही. त्यामुळे बेलगाम कृषिमंत्र्यांचा राजीनामा घेण्याची संपूर्ण राज्याची भावना असली तरी अजितदादा आणि फडणवीस साहेबांची राजकीय अपरिहार्यता नेमकी काय आहे, हे कळत नाही. राजकीय अपरिहार्यता असावी, पण जनतेच्या भावनांचा उद्रेक होणार नाही इतकीही नसावी.

महत्त्वाचे म्हणजे कृषी खात्याची जबाबदारी आज सक्षम आणि संवेदनशील मंत्र्याकडे असणे गरजेचे असल्याने अर्थमंत्र्यांनी स्वतःच कृषी खात्याचीही जबाबदारी सांभाळावी, हेच शेतकऱ्यांच्या हिताचे ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.

Rohit Pawar Allegation Art Center MLA Brother Shooting Police Suppress

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात