नाशिक : “पवार संस्कारित” इतर नेत्यांचे काढायचे वाभाडे; पण सगळी पदे पवारांच्याच घरात खेचायचे डाव खेळायचे!!, असला प्रकार पवार कुटुंबीयांकडून सुरू आहे. Pawar family
शरद पवारांनी राजकीय संस्कार केलेल्या इतर नेत्यांच्या उणिवा जाहीरपणे काढायच्या त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गैरवर्तणुकीचे आरोप ठेवायचे, पण त्याचवेळी पवारांच्या कुटुंबातच पक्षाची आणि सरकार मधली पदे वाटून घ्यायची असला हा डाव सुरू असल्याचे रोहित पवारांच्या आजच्या ट्विटमधून समोर आले.
रोहित पवारांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना टार्गेट केले. त्यांचे वेगवेगळे व्हिडिओ शेअर करून त्यांचा राजीनामा मागितला. खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यासाठी दिल्लीत लॉबिंग केले. त्यांनी त्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांची महाविकास आघाडीच्या खासदारांसह भेट घेतली. माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात पवार कुटुंबीयांनी मोर्चा खोलला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील माणिकरावांविषयी असमाधान व्यक्त केले. पण माणिकरावांना अजून त्यांनी मंत्रिमंडळातून काढले नाही.
या पार्श्वभूमी रोहित पवारांनी आज पुन्हा एकदा माणिकरावांनाच टार्गेट केले पण त्या पलीकडे जाऊन माणिकराव कोकाटे यांच्यासारख्या असंवेदनशील नेत्याकडून कृषिमंत्री पद काढून घेऊन ते अजित पवारांनी स्वतःकडे घ्यावे, अशी मागणी केली. जणू काही राज्य मंत्रिमंडळाचे अजित पवार हे एकटेच मालक आहेत, असा आव रोहित पवारांनी आणला.
पण त्या पलीकडे जाऊन स्वतःच्या राष्ट्रवादीत देखील शरद पवारांनी पवार कुटुंबीयांमध्येच जास्त पदे वाटून घेतली. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पदावरून हटल्याबरोबर रोहित पवारांना सचिव पदाची जबाबदारी दिली त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या सेलच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली. त्यामुळे राष्ट्रीय मान्यता नसलेल्या पक्षाचे राष्ट्रीय पक्षाध्यक्ष शरद पवार कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे आणि सचिव रोहित पवार अशी पदे घरातच वाटली गेली.
छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या सुरज चव्हाणच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मोर्चा खोदला. अजित पवारांनी त्याला ताबडतोब पायउतार केले. पण एका रात्रीत पोलीस स्टेशनमध्ये हजर करून त्याला पहाटे जामीन मिळवण्याची व्यवस्था केली. पण अजितदादांनी माणिकराव कोकाटे यांना त्यांनी अजून तरी हात लावला नाही. अजित पवार माणिकरावांना हात लावत नाही म्हणून त्यांचे पद काढून घेऊन ते पद अजित पवारांनी स्वतःकडे घ्यावे, अशी सूचना रोहित पवारांनी केली.
पण सत्तेसाठी हावरट झालेल्या राष्ट्रवादीच्या पवार संस्कारित नेत्यांमुळे मधल्या मध्ये भाजपची बदनामी होत राहिलीय.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App