विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : विधिमंडळात ऑनलाइन रमी खेळणारी किंवा न रमी खेळणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची विकेट काढण्यासाठी पवार कुटुंब एकवटले आहे. रोहित पवारांच्या बरोबरच सुप्रिया सुळेंनी दिल्लीतून त्यासाठी “राजकीय गोलंदाजी” केली आहे. ManikRao kokate
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केल्यानंतर देखील माणिकराव कोकाटे यांनी तात्काळ राजीनामा द्यायला नकार दिला. उलट आपली बदनामी करणाऱ्यांना आपण कोर्टात खेचू, असा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला. ऑनलाइन रमी प्रकरणाची चौकशी विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती यांनी करावी. त्यामध्ये मी दोषी आढळलो, तर थेट राज्यपालांकडे जाऊन राजीनामा देईन, असे वक्तव्य कोकाटे यांनी नाशिक मधल्या पत्रकार परिषदेत केले.
त्यानंतर रोहित पवारांनी माणिकराव कोकाटे यांचा ऑडिओ सकटचा व्हिडिओ शेअर केला त्यामध्ये दुष्काळग्रस्त आदिवासी बांधवांना दुधाळ गाई देण्याचा विषय विधिमंडळात चर्चेस आला असताना माणिकराव ऑनलाईन रमी खेळत होते, असा दावा केला.
महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह जी चौहान यांची आज भेट घेतली. याप्रसंगी महाराष्ट्राच्या विधानसभेत रमी खेळणारा तसेच सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका मांडणारा कृषीमंत्री राज्याला नको. राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सातत्याने आपल्या वादग्रस्त विधाने… pic.twitter.com/kgOLnuvD4S — Supriya Sule (@supriya_sule) July 22, 2025
महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह जी चौहान यांची आज भेट घेतली. याप्रसंगी महाराष्ट्राच्या विधानसभेत रमी खेळणारा तसेच सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका मांडणारा कृषीमंत्री राज्याला नको. राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सातत्याने आपल्या वादग्रस्त विधाने… pic.twitter.com/kgOLnuvD4S
— Supriya Sule (@supriya_sule) July 22, 2025
#राजीनामा_द्यावाच_लागेल! सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषिमंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं आहे. उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरु होती, पण ‘ओसाड गावच्या पाटलांना’ या चर्चेत… pic.twitter.com/KQJE4eHtwz — Rohit Pawar (@RRPSpeaks) July 22, 2025
#राजीनामा_द्यावाच_लागेल!
सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषिमंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं आहे. उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरु होती, पण ‘ओसाड गावच्या पाटलांना’ या चर्चेत… pic.twitter.com/KQJE4eHtwz
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 22, 2025
त्याआधी सुप्रिया सुळे यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेऊन माणिकराव कोकाटे यांच्या विषयी तक्रार केली महाराष्ट्राला असा असंवेदनशील कृषिमंत्री नको. चांगला संवेदनशील कृषिमंत्री द्या, अशी मागणी त्यांनी चौहान यांच्याकडे केली. यावेळी सुप्रिया सुळे यांच्या समावेत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे, बजरंग सोनवणे, धैर्यशील मोहिते यांच्याबरोबरच महाविकास आघाडीचे अन्य पक्षांचे देखील खासदार होते. चौहान यांच्या भेटीचा फोटो त्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला.
कोणत्याही परिस्थितीत माणिकराव कोकाटे यांची राजकीय विकेट काढायचीच यासाठी अशा पद्धतीने पवार कुटुंबीय एकवटले. या प्रकरणाची सुरुवात रोहित पवारांनीच केली. त्यानंतर आता सुप्रिया सुळेंनी देखील त्यांना साथ दिली. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीला साथीला घेतले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App