विशेष प्रतिनिधी
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हिंसाचार मारहाण वगैरे प्रकारांचा सोशल मीडियातून निषेध करून छावा संघटनेला “शांत” करायचा प्रयत्न केला, पण मारहाण करणाऱ्या सुरज चव्हाण वर कारवाई करणार की नाही, याविषयी मौन बाळगले.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रम्मी खेळण्यावरून झालेल्या राजकीय वादाचे रूपांतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि संलग्न संस्थांच्या भांडणात झाले. सुरज चव्हाण यांनी छावा संघटनेचे पदाधिकारी विजय घाडगे पाटील यांना मारहाण केली. या मारहाणीचे पडसाद राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमटले. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या समर्थन केले नाही. मात्र, सुरज चव्हाणने या मारहाणीचे समर्थन केले पण हे प्रकरण पेटलेले पाहताच माफी मागणारा व्हिडिओ शेअर करून तो फरार झाला. पोलिसांनी त्याच्या विरोधात लातूरच्या स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
या सगळ्यातून राष्ट्रवादी अंतर्गतच मोठ्या संघर्ष उभा राहिल्याचे चित्र निर्माण झाले. एकतर माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ रोहित पवारांनी शेअर केला. त्यावरून छावा संघटनेने आंदोलन केले म्हणून सुरज चव्हाणने छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केली. हे सगळे प्रकरण राष्ट्रवादी काँग्रेस आणि संलग्न संघटना यांच्यात घडले. पण त्यामुळे फडणवीस सरकारची बदनामी झाली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी त्याविषयावरचे मौन सोडले. त्यांनी सोशल मीडियातून हिंसाचाराचा आणि मारहाणीचा निषेध केला पण त्यामध्ये सुरज चव्हाणचे नावही घेतले नाही. त्यामुळे अजित पवार यांच्या हेतूविषयी शंका निर्माण झाली. अजित पवार हे सुरज चव्हाण वर कारवाई करणार की नाही?, असा संशय तयार झाला.
सुरज चव्हाण यांच्या हिंसक कृतीमुळे सुनील तटकरे यांचा मराठवाडा दौरा अडचणीत सापडला धाराशिव मध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज पुन्हा त्यांना घेरले. त्यामुळे तटकरे यांना सगळे म्हणणे शांतपणे ऐकून घ्यावे लागले. एवढे सगळे होऊनही अजितदादांनी सुरज चव्हाण वर थेट कुठली कारवाई न करता आणि त्याचे नावही न घेता फक्त हिंसेचा आणि मारहाणीचा विरोध नोंदविला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App