ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची नाही खात्री; पण अमित शाहांनी फडणवीसांना केलेल्या सूचनांची संजय राऊतांकडे “पक्की माहिती”!!

Sanjay Raut Fadnavis

नाशिक : ठाकरे बंधूंची राजकीय युती होईल की नाही याची नाही खात्री; पण अमित शाहांनी फडणवीसांना केलेल्या सूचनांची संजय राऊतांकडे “पक्की माहिती”!!, असला प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणातून समोर आला.sanjay raut claims of fadnavis ministry’s reshuffle

ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना मुलाखतीत प्रश्न विचारला. त्यावर उद्धव ठाकरेंनी लंबेचौडे भाषण केले. ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुसलमान आणि गुजराती बंधू पण कसे खुश झाले याचे वर्णन केले. पण दोघांची राजकीय युती होईल की नाही याविषयी खात्रीलायक शब्द दिला नाही. संजय राऊत यांनी देखील युतीविषयी आग्रही सवाल केला नाही.

पण याच संजय राऊत यांच्याकडे अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना केलेल्या सूचनेची पक्की माहिती आली आणि म्हणूनच त्यांनी पत्रकार परिषदेत ती उघडपणे सांगून टाकली.



अमित शाहांनी म्हणे, फडणवीसांना राज्यातल्या चार-पाच मंत्र्यांना वगळायला सांगितले आहे. हे सगळे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतले आहेत आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीतले आहेत. त्यात माणिकराव कोकाटे यांच्या नावाचा समावेश आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.

– राऊतांच्या दाव्याची पोलखोल

वास्तविक यामध्ये संजय राऊत यांनी दावा करण्यासारखी काही बाबच शिल्लक नाही. कारण फडणवीस मंत्रिमंडळात कोणते मंत्री उपद्रव देतात आणि कोणते मंत्री देत नाहीत, हे राऊतांपेक्षा फडणवीस यांना चांगली माहिती आहे. योग्य वेळ येताच या मंत्र्यांचा “बंदोबस्त” करायचाही निर्णय आधीच झाला आहे. यात नवीन काही नाही. अजितदादांची राष्ट्रवादी मूळात मित्र पक्षांना त्रास देण्यासाठीच कुप्रसिद्ध आहे. पण दोन राष्ट्रवादींचे विलीनीकरण करायचे की नाही हे भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाला विचारून निर्णय घ्यावा लागेल, असे वक्तव्य करून अजितदादांची राष्ट्रवादी वठणीवर आल्याची कबुली आधीच सुनील तटकरेंनी देऊन टाकली आहे. त्यामुळे तसेही अजितदादांच्या राष्ट्रवादीचे लगाम भाजपच्या हातात आपसूक येऊन बसले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीतले मंत्री ठेवायचे किंवा घडायचे हे योग्य वेळ येताच शाह आणि फडणवीस ठरवतील आणि डच्चू द्यायचा निर्णय अंमलातही आणतील. याबाबत ते अजितदादांना फार तर inform करतील.

जे अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या बाबतीत होईल तेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बाबत होईल. तिथे फारसे काही वेगळे घडण्याची शक्यता नाही. कारण कुणा मंत्र्याच्या घरात नोटांची बंडले सापडली, कुणाच्या आईच्या नावाने डान्सबार आहे ही माहिती माध्यमांना नवी असली, तरी ती केंद्रीय गृह मंत्रालयाला आणि राज्यातल्या गृह मंत्रालयाला नवीन नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांचे ऑपरेशनही फारसे कठीण नाही.

त्यासाठी संजय राऊत यांनी अमित शाहांनी देवेंद्र फडणवीस यांना काय सूचना केल्या, याची आपल्याकडे पक्की माहिती आहे. चार-पाच मंत्र्यांना वगळायचे आहे. त्यात माणिकराव कोकाटे यांचे देखील नाव आहे, अशा डिंग्या मारायचे काहीच कारण नाही. कारण उपद्रवी मंत्र्यांना डच्चू मिळणार यात कुठलीही नवीन बातमी नाही. “पक्की माहिती” वगैरे तर काहीच नाही!

sanjay raut claims of fadnavis ministry’s reshuffle

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात