विशेष प्रतिनिधी
हिंगोली : NCP Tatkare राज्यात हनीट्रॅपमुळेच शिंदे सरकार सत्तेत आल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे वक्तव्य मूर्खपणाचे आहे. एका मोठ्या पदावर काम करणाऱ्या या व्यक्तीने केलेले हे वक्तव्य अशोभनीय आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शनिवारी ता. १९ हिंगोलीत पत्रकार परिषदेत दिली.NCP Tatkare
हिंगोली येथे आढावा बैठकीच्या निमित्ताने आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजीमंत्री धनंजय मुंडे, आमदार राजेश नवघरे, जिल्हाध्यक्ष बी. डी. बांगर यांची उपस्थिती होती.NCP Tatkare
यावेळी तटकरे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत लाडकी बहिण योजना, शेतकऱ्यांचे १४०० कोटी रुपयांचे विज देयक माफ केले तसेच विविध विकास कामे केल्यामुळेच आम्हाला २३८ जागा जिंकता आल्या आहेत. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांचे म्हणणे जाणून घेत आहोत. महायुतीबाबतचा निर्णय तीनही पक्षाचे वरिष्ठ नेतेच घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले.NCP Tatkare
राज्यात राष्ट्रवादी (अजित पवारगट) सत्तेत सहभागी होतांना केंद्रातील भाजपा नेत्यांशी चर्चा करण्यात आली होती. त्यानंतरच आम्ही सत्तेत सहभागी झालो आहोत. राज्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत कुठल्याही प्रकारची चर्चा नाहीत. मात्र पुढील काळात विलनीकरणाचा विषय पुढे आलाच तर भाजपाच्या नेत्यांशी चर्चा करावी लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी हनी ट्रॅप बाबत केलेले वक्तव्य मुर्खपणाचे आहे. विशिष्टपदावर काम करणाऱ्यांनी केलेले वक्तव्य बालीश असून अशोभनीय असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या सत्ताधारी माजलेच या वक्तव्याचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला. महाविकास आघाडीची मंडळी विधानसभेच्या पराभवाच्या नैराश्येतून अद्यापही बाहेरच पडली नाही. त्यामुळेच ते असे वक्तव्य करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधींचे वर्तन जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारे, सुसंस्कृत असले पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App