विशेष प्रतिनिधी
मुंगेर (बिहार) : केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री आणि लोक जनशक्ती पक्ष (रामविलास)चे अध्यक्ष चिराग पासवान यांनी खळबळजनक दावा करत विरोधकांवर थेट हल्ला चढवला आहे. बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात आयोजित सभेत बोलताना त्यांनी म्हटले की, “माझा जीव घेण्यासाठी विरोधकांनी मला बॉम्बने उडवण्याचा कट रचला आहे.” Chirag Paswan
चिराग म्हणाले, “माझ्यावर मानसिकदृष्ट्या खचविण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण आता माझा जीव घेण्याचा कट आखण्यात आला आहे. मला धमक्या देणाऱ्यांनी पोलिसांत तक्रार झाल्यानंतरही माघार घेतलेली नाही. पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी मी वाघाचा पिल्ला आहे. मी कोणासमोरही झुकत नाही आणि कोणत्याही धमकीला घाबरत नाही.” Chirag Paswan
चिराग पासवान यांनी यावेळी त्यांच्या काका आणि एलजेपीमधील फुटलेल्या गटाचे नेते पशुपती कुमार पारस यांच्यावरही टीका केली. पारस गटाच्या आरजेडीशी जवळीक वाढवत असल्याच्या पार्श्वभूमीवर चिराग यांनी अप्रत्यक्षपणे आरजेडीवरही निशाणा साधला. बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट’ हा माझा नारा अनेकांना अस्वस्थ करत आहे. कारण तो त्यांच्या पारंपरिक जातीय समीकरणांना धक्का देतो. जे लोक कधीच बिहारच्या विकासात स्वारस्य घेत नव्हते, त्यांनी राज्याला मागे टाकले, आज तेच लोक नवी खोटी आश्वासने देऊन मत मागत आहेत,” असे चिराग म्हणाले.
चिराग पासवान यांना काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यामुळे या बॉम्ब हल्ल्याच्या कटाचा आरोपही त्याच संदर्भात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लोक जनशक्ती पक्ष (रामविलास)च्या नेत्यांनी चिराग यांच्या आरोपांना गांभीर्याने घेतले असून, “हे धमकीप्रकरण केवळ राजकीय दबावाचे नाही तर त्यांच्या लोकप्रियतेच्या भीतीने आखलेले षड्यंत्र आहे,” असे पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. “चिरागजी म्हणजे शेर का बेटा आहे. त्याला घाबरवणं अशक्य आहे,” असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App