नाशिक : ठाकरे बंधूंचे ऐक्य असो किंवा दोन राष्ट्रवादींचे विलीनीकरण असो हे दोन्ही निर्णय ठाकरे किंवा पवार यांनी स्वतंत्रपणे घेण्यासारखे उरलेलेच नाहीत. ते निर्णय घेणे किंवा न घेणे हे भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाच्या हातात जाऊन बसलेत. याचे प्रत्यंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या एका कबुलीतून आले.
दोन राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाशी बोलावे लागेल, असे वक्तव्य सुनील तटकरे यांनी केले. या एका ओळीच्या वक्तव्यातून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची आजची वस्तुस्थिती उघड्यावर आणली. महाराष्ट्रात मराठी माध्यमांनी ठाकरे बंधूंच्या ऐक्याची किंवा दोन पवारांच्या दोन राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची कितीही चर्चा घडविली, तरी प्रत्यक्षात ठाकरे बंधूंचे ऐक्य किंवा दोन राष्ट्रवादींचे विलीनीकरण हे दोन्ही विषय ठाकरे आणि पवार यांचे “घास” उरलेले नाहीत. आपल्याच पक्षांच्या राजकीय भवितव्याबाबत ते स्वतः स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकत नाहीत, ही वस्तुस्थिती मराठी माध्यमे सांगत नव्हती. ही माध्यमे फक्त ठाकरे आणि पवारांचे ढोल बडवत होती. पण प्रत्यक्षात महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या गेमा आणि काळा भाजप फिरवतोय. भाजप आपल्याला हवे तसे इतरांना वागवतोय, याची कबुली मराठी माध्यमे देत नव्हती. ती कबुली सुनील तटकरे यांनी अप्रत्यक्षपणे देऊन टाकली.
तटकरे यांचे वक्तव्य
मूळात दोन राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा सध्या तरी दृष्टीपथात नाही. कारण ती चर्चा अद्याप माझ्यापर्यंत तरी आलेली नाही. तशी प्रत्यक्षात वेळ येईल तेव्हा आम्हाला भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाशी बोलावे लागेल. कारण भाजपने आम्हाला एका विश्वासाने महायुतीमध्ये घेतले आहे त्यामुळे त्यांच्याशी बोलूनच पुढचा निर्णय घ्यावा लागेल, असे सुनील तटकरे म्हणाले. याचा सरळ अर्थ असा की दोन राष्ट्रवादींचे विलीनीकरण हा पवार काका – पुतण्यांचा स्वतंत्र विषयच उरलेला नसून तो आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या हातात गेलाय. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने होकार दिला तर राष्ट्रवादीचे विलीनीकरण होईल आणि नकार दिला तर ते होणार नाही, हेच उघड सत्य सुनील तटकरे यांनी अप्रत्यक्षपणे कबूल केले. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनीही सुनील तटकरे यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला.
एरवी मराठी माध्यमे महाराष्ट्राचे राजकारण कसे पवार बोटावर फिरवतात किंवा एका कटाक्षावर इकडचे तिकडे करतात, याचे ढोल पिटत असतात. पण आता खुद्द त्यांच्याच पक्षाचे विलीनीकरण किंवा स्वतंत्र्यीकरण हा विषय त्यांच्याच हातात उरलेला नाही, हे सत्य सांगण्याचे धैर्य मराठी माध्यमांनी कधी दाखविले नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App