नाशिक : जनसुरक्षा विधेयकावरून काँग्रेसमध्ये गोंधळ महाविकास आघाडी विस्कळीत; माओवाद्यांचे समर्थन करताना विरोधक अडकले कोंडीत!!, हीच खरी महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांची अवस्था झाली.
फडणवीस सरकारने माओवाद्यांच्या आणि शहरी नक्षलवाद्यांच्या विरोधात आणलेले जनसुरक्षा विधेयक विधानसभेने मंजूर केले फडणवीस सरकारकडे प्रचंड बहुमत असल्याने ते विधेयक मंजूर करण्यामध्ये कुठली अडचण आली नाही. या विधेयकावर झालेल्या मतदानात फक्त मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांनी अधिकृतरीत्या विरोधी मत नोंदविले. पण या सगळ्या राजकारणामध्ये काँग्रेसचे हायकमांड चिडले. त्यांनी महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांचे कान उपटले. काँग्रेस हायकमांडने विजय वडेट्टीवार आणि सतेज पाटील यांना कारणे दाखवा नोटिसा धाडल्याची बातमी आली. त्यामुळे राज्यातले काँग्रेसचे नेते खडबडून जागे झाले. वेगवेगळ्या प्रकारचे खुलासे करायला ते बाहेर आले.
– नोटीस नसताना दीर्घ खुलासा
आम्हाला काँग्रेस हायकमांडने नोटीस धाडली नाही, असा खुलासा विजय वडेट्टीवार यांनी केला, त्यांना सतेज पाटलांनी दुजोरा दिला. पण त्यानंतर दोन्ही नेत्यांनी केलेल्या खुलाशातून काँग्रेस मधला गोंधळ आणि महाविकास आघाडीतला विस्कळीतपणाच समोर आला. बँकेची निवडणूक असल्याने आपण विधानसभेत त्यादिवशी हजर नव्हतो. पण काँग्रेसने जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसने स्ट्रॉंगली विरोध करायला हवा होता. खरंतर त्या दिवशी आम्ही सभात्यागच करायला हवा होता. विधानसभेत काँग्रेसच्या नेत्यांनी विरोधात भाषणे केली, ती आम्ही हायकमांडला आणि प्रदेशाध्यक्षांना पाठवणार आहोत. या विधेयकावर समितीत चर्चा झाल्याचे सांगून सरकारने विरोधकांचा आवाज दाबला. विधेयकाला कसा विरोध करायचा याची नोट प्रदेशाध्यक्षांनी दिली होती, ती सगळ्यांपर्यंत पोहोचली होती. पण महाविकास आघाडीत देखील समन्वय साधायला हवा होता, तो तसा साधला गेला नाही हे खरं आहे, असा खुलासा विजय वडेट्टीवार यांनी केला.
जनसुरक्षा विधेयक अचानक विधानसभेत आले. त्यावेळी माहिती नसल्याने विजय वडेट्टीवार सभागृहात उपस्थित नसतील. माझं त्यांच्याशी काही बोलणे झालेले नाही त्यांच्याशी आता बोलणे होईल. विधानसभेत जनसुरक्षा विधेयकावर आम्ही काय बाजू मांडली हे आम्ही हायकमांडला कळवू, समितीमध्ये आम्ही कोणत्या सूचना केल्या हे त्यांना सांगू, असा खुलासा सतेज पाटील यांनी केला.
– महाविकास आघाडी विस्कळीत
विजय वडेट्टीवार आणि सतेज पाटलांनी काँग्रेस हायकमांडची नोटीस आल्याचा इन्कार केला, तरी त्यांनी केलेल्या खुलाशांमधून काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांचे चांगलेच कान उपटल्याचे दिसून आले. त्याचबरोबर महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव होता हे देखील समोर आले. अन्यथा नोटीस न येताच विजय वडेट्टीवार आणि सतेज पाटील यांनी एवढा दीर्घ खुलासा करायचे कारण नव्हते. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जनसुरक्षा विधेयकाच्या बाजूने कौल दिला, तर शिवसेनेने तोंडी विरोध केला, पण प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी सरकारच्या विरोधात मतदान केल्याचे आढळले नाही. कारण या विधेयकाच्या विरोधात फक्त मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांचे अधिकृत मत नोंदविले गेले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App