वृत्तसंस्था
कीव्ह : Ukraine रशियाशी ४० महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धादरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी मोठा राजकीय फेरबदल केला आहे. त्यांनी विद्यमान उपपंतप्रधान युलिया स्विरीडेंको यांना देशाचे नवे पंतप्रधान नियुक्त केले. दुसरीकडे, दीर्घकाळपर्यंत सीएम पदावर राहिलेल मावळते पीएम डेनिस शम्हाल यांना संरक्षणमंत्री केले आहे. मावळते संरक्षणमंत्री रुस्तेम उमेरोव यांना अमेरिकेत युक्रेनचे नवे राजदूत केले जाऊ शकते.Ukraine
झेलेन्स्की म्हणाले, ३९ वर्षीय स्विरीडेंको एक अर्थतज्ज्ञ आहेत आणि त्या सरकारचे नेतृत्व करतील आणि कामकाजात बदल आणतील. शम्हाल यांचा अनुभव युक्रेनचे संरक्षणमंत्री म्हणून मौल्यवान आहे. स्विरीडेंको यांनी या वर्षी अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प प्रशासनासोबत खनिज करार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. यानंतर स्विरीडेंको यांचे कौतुक झाले होते.नव्या नियुक्त्यांसाठी संसदेची मंजुरी घेतली जाईल. सध्या पूर्ण संसद झेलेन्स्की यांच्या मागे आहे. स्विरीडेंको युक्रेनच्या दुसऱ्या महिला पीएम असतील. त्यांच्याआधी युयुलिया टिमोशेंको यांनी दोन वेळा पद सांभाळले होते.
ट्रम्पच्या ५० दिवसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष, रशियाने नाटक ठरवले
जर ५० दिवसांच्या आत रशिया-युक्रेन शांतता करार झाला नाही तर रशियावर १००% सेकंडरी टेरिफ लादले जाईल, अशी घोषणा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सोमवारी केली. यावर, नाटोचे सरचिटणीस आणि जर्मन चान्सलर यांनी हे पाऊल सकारात्मक म्हटले. रशियाचे माजी अध्यक्ष व सुरक्षा परिषदेचे सदस्य दिमित्री मेदवेदेव यांनी कराराच्या धमकीला “नाट्यमय अल्टिमेटम” असे संबोधून नकार दिला.
पुतीनवर ट्रम्प यांचा दृष्टिकोन बदलण्याचे श्रेय पत्नीला जाते
युक्रेनमध्ये मेलानिया ट्रम्प यांना ‘एजंट मेलानिया ट्रम्पेन्को’ असे संबोधून त्यांचे कौतुक केले जात आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अलीकडेच सांगितले की त्यांची पत्नी मेलानिया यांनी त्यांना पुतीन यांच्या दुटप्पीपणाबद्दल इशारा दिला होता. यानंतर, ट्रम्प यांचा रशियाबद्दलचा दृष्टिकोन बदलला आणि अमेरिकेने युक्रेनला पॅट्रियट क्षेपणास्त्र प्रणाली देण्याची घोषणा केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App