Shashikant Shinde : प्रदेशाध्यक्ष झाल्यावर शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया- आर आर पाटलांसारखे संधीचे सोने करणार

Shashikant Shinde

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Shashikant Shinde राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी पक्ष संघटनेला अधिक भक्कम करण्याचा निर्धार व्यक्त केला. पक्ष विस्तारासाठी राज्यभर सक्रियपणे काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गोरगरीब जनतेच्या हितासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही देत लवकरच राज्यभर दौरा करणार असून आर आर पाटलांप्रमाणे संधीचे सोने करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपला आगामी रणनिती सांगितली.Shashikant Shinde

काय म्हणाले शशिकांत शिंदे?

शरद पवार आणि पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा प्रदेशाध्यक्ष केल्याबद्दल मी मनापासून सर्वांचे आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या वतीने महाराष्ट्राच्या जनतेला ग्वाही देऊ इच्छितो, ज्या नेत्याने गोर-गरीब जनतेसाठी अहोरात्र कष्ट केले, त्या नेत्यांच्या पक्षाच्या एक कार्यकर्ता म्हणून राज्यातील अनेक प्रश्नांना आणि अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करेन. या काळात पक्ष संघटना वाढवत असताना, ही पक्ष संघटना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवेल, महाराष्ट्रात पक्षाची सत्ता आणण्यासाठी दिवसरात्र कष्ट करेल, अशी ग्वाही शशिकांत शिंदे यांनी दिली.Shashikant Shinde



रस्त्यावर उतरण्याची घोषणा

पक्षातील अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी पात्र असताना सुद्धा मला मिळालेल्या संधीचे सोने करेन. सामान्य कुटुंबातील व्यक्ती नेता कसा होतो, हे आर आर पाटलांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. जनतेच्या प्रश्नांसाठी आणि शासनाच्या आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज तर उठवणार आहेच, वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात जनतेची जागृती करेन, अशी ग्वाही देतो, असेही शशिकांत शिंदे म्हणाले.

हल्ली आमिष दाखवून सत्ताबदल केला जातो

पूर्वीच्या राजकारणाची आणि आताच्या राजकारणाची पद्धत वेगळी आहे. हल्ली सत्ताबदल हा अधिकार, सत्तेच्या माध्यमातून, आमिष दाखवून केला जातो. या माध्यमातून हे पहिले आव्हान आहे. या सर्व बदललेल्या यंत्रणेला लोकांमध्ये जागृत करुन, सर्वसामान्य जनतेसाठी काम करेन. महिन्याभरात पक्षाने जी जबाबदारी दिली आहे, राज्याचा दौरा करेन, पक्षसंघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करेन. नवीन तरुणांना संधी देईन. सर्व धर्मीय तरुणांना एकत्र करुन संघटना मजबूत करेन, असे शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

कोण आहेत शशिकांत शिंदे?

शशिकांत शिंदे यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1963. रोजी झाला. त्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील हुमगाव आहे. त्यांचे शिक्षण वाणिज्य शाखेत झाले असून ते पदवीधर आहेत. वडिलांचे नाव जयवंतराव शिंदे आणि आईचे नाव कौसल्या शिंदे आहे. त्यांची माथाडी कामगारांचे प्रभावी नेते म्हणून ओळख आहे. शशिकांत शिंदे हे लहानपणापासूनच समाजकारण आणि राजकारणात सक्रिय आहेत.

चार वेळा विधानसभा सदस्य (आमदार)

1999 साली पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली आणि जावळी विधानसभा मतदारसंघातून 12,000 मतांच्या फरकाने प्रथम विजयी.
दोन वेळा जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार.
2009 ते 2014 असे दोन टर्म कोरेगाव मतदारसंघाचे नेतृत्त्व.
महाराष्ट्र राज्याच्या कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळाचे जलसंपदामंत्री राहिले.
नवी मुंबई बाजार समितीचे सचिव म्हणूनही काम पाहिले.
कोरेगाव मतदारसंघात शालिनी पाटील यांचा केला पराभव.
2019 साली विधानसभा निवडणुकीत महेश शिंदे यांच्याकडून पराभव.
2024 विधानसभा निवडणुकीत पुन्हा शिवसेना (शिंदे गट) महेश शिंदे यांच्याकडून पराभव.

Shashikant Shinde: Will Emulate RR Patil, Strengthen NCP (SCP)

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात