नाशिक : जयंत पाटलांचा “अडथळा” सरताच पवारांच्या घरातच पदांची वाटणी; राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य सचिव पदी रोहित पवारांची वर्णी!!, कसे आज घडले.
जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देताच शरद पवारांनी शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती केली. त्यांनी देखील पवारांच्या मनातले ओळखून आमदार रोहित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य सचिव पदी नियुक्ती केली. त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आघाड्यांच्या प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली. त्यामुळे पवारांच्या घरातच राष्ट्रवादी काँग्रेसची सगळी महत्त्वाची पदे आली. शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष, सुप्रिया सुळे कार्यकारी अध्यक्ष आणि रोहित पवार मुख्य सचिव अशी पदांची वाटणी झाली. बाकीचे सगळे नेते फक्त शरद पवारांच्या छायेत राहिले नाहीत, तर ते सगळ्या पवार कुटुंबांच्या सावटाखाली आले.
जयंत पाटलांनी आजच्या भाषणात बरेच काही between the lines बोलून दाखविले. शरद पवारांनी आपल्याला प्रदेशाध्यक्ष करताना मेहबूब शेख, सक्षणा सलगर, यांच्यासारख्या सामान्य घरातल्या कार्यकर्त्यांना महत्त्वाची पदे दिली. आपण सगळ्यांना बरोबर घेऊन काम केले. कुठले फाउंडेशन काढले नाही. कुठला वेगळा गट काढला नाही. आपल्याविरुद्ध बरीच कारस्थाने झाली, तरी पक्ष आणि पवारांवरची निष्ठा सोडली नाही, असे जयंत पाटलांनी सांगितले. त्यांचे हे वाग्बाण रोहित पवार आणि रोहित पाटलांच्या दिशेने होते. रोहित पवार आणि रोहित पाटील यांच्याबरोबरचे त्यांचे शीतयुद्ध कधी थांबले नाही.
जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पदावर असेपर्यंत त्यांनी पक्ष संघटनेत रोहित पाटील आणि रोहित पवार यांना महत्त्वाचे स्थान दिले नाही. त्यांना फक्त आमदारच ठेवले. दोन्ही रोहितनी जयंत पाटलांचे नेतृत्व कधी मानले नाही. त्यांना कायम पाण्यात पाहिले. जयंत पाटलांविरुद्ध पक्षात आणि पक्ष बाहेर बोलत राहिले पण शरद पवारांनी पक्षशिस्तीचा बडगा दाखवून दोन्ही रोहितना कधी गप्प केले नाही. पण त्याच वेळी जयंत पाटलांना देखील पद मुक्त केले नाही.
पण जयंत पाटलांचा “राजकीय अडथळा” दूर होताच नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी शरद पवारांच्या मनातले ओळखले. त्यांनी रोहित पवारांना मुख्य सचिव पद देऊन टाकले. पण यातूनच शरद पवारांनी शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून स्वतःची घराणेशाही पक्षावर घट्ट करून घेतली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App