विशेष प्रतिनिधी
मुंबई : Bombay Stock मुंबईतील आर्थिक घडामोडींचे प्रमुख केंद्र असलेल्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या (BSE) फिरोज टॉवर इमारतीला बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी ईमेलद्वारे देण्यात आली आहे. या ईमेलमध्ये इमारतीमध्ये चार आरडीएक्स आयईडी बॉम्ब ठेवले असल्याचा दावा करण्यात आला असून, सोमवार दुपारी ३ वाजता स्फोट होणार असल्याचे नमूद करण्यात आले होते.Bombay Stock
धमकीचा हा ईमेल बीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर प्राप्त झाला. रविवारी कार्यालय बंद असल्याने हा ईमेल एका अधिकाऱ्याच्या निदर्शनास सोमवारी आला. त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच मुंबई पोलिस आणि बॉम्ब शोधक व निकामी पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि संपूर्ण परिसराची कसून तपासणी सुरू केली. मात्र, तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
या घटनेनंतर रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ईमेल पाठवणाऱ्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सायबर कायद्याच्या ३५१(१)(ब), ३५३(२), ३५१(३) आणि ३५१(४) कलमांअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App