विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Pune ISIS पुण्यात उघडकीस आलेल्या आयसिस स्लीपर मॉड्यूल प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. या दहशतवादी कटात राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने अकरावा संशयित रिझवान अली उर्फ अबू सलमा उर्फ मौला याला अटक केली आहे. देशात इस्लामी राजवट प्रस्थापित करण्यासाठी हिंसाचाराचा कट रचणाऱ्या या गटात रिझवानची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे NIA च्या तपासात स्पष्ट झाले आहे.Pune ISIS
रिझवान अली हा अनेक दिवसांपासून फरार होता आणि त्याच्यावर ३ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. त्याच्या अटकेसाठी विशेष NIA न्यायालयाने नॉन-बेलेबल वॉरंट (NBW) जारी केला होता.
तपासात असे उघड झाले आहे की, रिझवान अली ISIS या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या भारतातील नेटवर्कचा सक्रिय सदस्य होता. त्याने महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये दहशतवादी अड्ड्यांसाठी स्थळांची रेकी (recce) केली. याशिवाय, त्याने शस्त्र प्रशिक्षण, गोळीबाराचे प्रात्यक्षिक आणि आयईडी (Improvised Explosive Device) तयार करण्याचे प्रशिक्षण इतर कटातील साथीदारांना दिले.
या प्रकरणात आतापर्यंत खालील दहाजणांना अटक करण्यात आली असून सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत: मोहम्मद इमरान खान,मोहम्मद युनूस साकीअब्दुल कादिर पठाण, सिमाब नासिरुद्दीन काझी,झुल्फिकार अली बारोडावाला,शमिल नाचन,अकीफ नाचन, शहनवाज आलम,अब्दुल्ला फैज शेख,तल्हा खान.
सर्व आरोपींविरोधात UAPA (Unlawful Activities Prevention Act), स्फोटक पदार्थ कायदा, शस्त्र कायदा, तसेच भारतीय दंड संहितेच्या (IPC) विविध गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
NIA चा तपास दर्शवतो की या स्लीपर मॉड्यूलच्या माध्यमातून ISIS भारतात दीर्घकालीन उपस्थिती निर्माण करण्याच्या प्रयत्नात होता. यामध्ये स्थानिक तरुणांचे ब्रेनवॉश करून त्यांना हिंसक विचारसरणीकडे वळवले जात होते. अटक आरोपींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अतिरेकी साहित्याचे प्रसार, कटकारस्थानाची आखणी, शस्त्रप्रशिक्षण आणि स्फोटकांच्या साठवणुकीचे नियोजन केले होते.
रिझवान अलीच्या अटकेमुळे या कटातील आणखी काही महत्त्वाच्या सूत्रधारांची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. NIA सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, भारतात ISIS सारख्या संघटनांचे नेटवर्क पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी ही कारवाई निर्णायक ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App