विशेष प्रतिनिधी
मुंबई : CM Fadnavis शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे, खते व कृषी निविष्ठा मिळाव्यात यासाठी कृषी विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येईल, यात कृषी विभागास तपासणीसाठी अधिकार देण्यासाठी आवश्यक ते बदल करण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( CM Fadnavis ) यांनी विधान परिषदेत सांगितले.CM Fadnavis
विधान परिषदेत सदस्य सदाभाऊ खोत यांनी याबाबतची लक्षवेधी मांडली होती. यावेळी चर्चेत सदस्य एकनाथ खडसे यांनी सहभाग घेतला.CM Fadnavis
अनधिकृत ‘एच टी बी टी’ बियाणे विक्रीस परवाना नाही- डॉ.भोयर
एचटीबीटी बियाणे जप्त केल्याबाबत प्रश्नांना उत्तर देताना राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले, जनुकीय बदल बियाणे विक्रीस परवाना देण्यात आले, पण कपाशी ‘एच टी बी टी’ बियाणे विक्रीस परवाना नाही. आता सध्या राज्यामध्ये पेरणी हंगाम सुरू असून मोठ्या प्रमाणात ‘एच टी बी टी’ बियाणे साठवणूक करण्यात येत असल्याच्या माहितीनुसार ‘एच टी बी टी’ बियाणे जप्त करण्याचे निर्देश कृषी आयुक्तांनी ७ मार्च २०२५ रोजी पत्राद्वारे जिल्हा प्रशासनाला दिले होते. अनधिकृत ‘एचटीबीटी’ बियाणे जप्त केले आहे. त्या संबंधित बियाणे उत्पादकावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यामध्ये ३८ लाख स्मार्ट पोस्टपेड मीटर : फडणवीस
राज्यात विजेचे स्मार्ट पोस्टपेड मीटर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत २७,८२६ फीडर मीटर आणि ३८ लाख ग्राहक मीटर लावण्यात आले आहेत. या ग्राहकांना सौर तासांमधील विजेच्या वापरावर बिलामध्ये १० टक्के सवलत देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. राज्यात पहिल्यांदाच विजेचे दर कमी होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. मुख्यमंत्री म्हणाले, सर्वच राज्ये स्मार्ट पोस्टपेड मीटर लावत असून या योजनेसाठी केंद्र सरकारमार्फत महाराष्ट्राला २९ हजार कोटी रुपये मिळाले आहेत. स्मार्ट मीटर लावण्यासाठी निविदा काढण्यात आली होती, त्यातून चार विविध कंपन्यांना काम देण्यात आले आहे.
राज्यातील विजेचे दर कमी
इतर राज्यांपेक्षा आपल्या राज्यातील विजेचे दर कमी आहेत. स्मार्ट पोस्टपेड मीटर बसवण्याची सक्ती करण्यात आली नसून या मीटरमध्ये प्रत्येक युनिटचे कॅल्क्युलेशन ऑटोमॅटिक होत असल्याने वीज देयकामध्ये वाढ होण्याची शंका निर्माण होण्याचे कारण नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App