विशेष प्रतिनिधी
मुंबई :MLA residence suspended आकाशवाणी आमदार निवासातील उपहारगृहातील अन्नाच्या निकृष्ट दर्जावरून उफाळलेला वाद आता गंभीर वळणावर पोहोचला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) उपहारगृहाचा परवाना निलंबित केला आहे.MLA residence suspended
मंगळवारी रात्री शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी निकृष्ट अन्न दिल्याच्या आरोपाखाली उपहारगृहातील कर्मचाऱ्याला जबर मारहाण केली होती. ही घटना सीसीटीव्ही व मोबाईल कॅमेऱ्यांत कैद झाली असून संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणामुळे विधिमंडळातील लोकप्रतिनिधींच्या वर्तनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनाने बुधवारी सकाळी आकाशवाणी आमदार निवासातील उपहारगृहात तपासणी मोहीम राबवली. स्वयंपाकघर, साठवण कक्ष यांची सखोल चौकशी करण्यात आली. सुमारे चार तास चाललेल्या या तपासणीत विविध खाद्यपदार्थांचे नमुने घेण्यात आले, जे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. प्राथमिक तपासणीत अन्नाचा दर्जा अत्यंत सुमार आढळून आल्याने FDA ने तत्काळ कारवाई करत उपहारगृहाचा परवाना निलंबित केला.
दरम्यान, विधान परिषदेतील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परबयांनी ही बाब विधान परिषदेत उपस्थित करत आमदार संजय गायकवाड यांच्यावर “दादागिरीचा” आरोप करत त्यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या घटनेवर नाराजी व्यक्त करत म्हटलं, “लोकप्रतिनिधींनी हात उचलणं भूषणावह नाही. यामुळे संपूर्ण विधिमंडळाची व लोकशाही संस्थांची बदनामी होते. सभापती व अध्यक्षांनी याची गंभीर दखल घ्यावी.”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गायकवाड यांना जाहीरपणे समज देताना सांगितले, “जर अन्न निकृष्ट असेल, तर त्यावर कायदेशीर तक्रार करता येऊ शकते. पण मारहाण करणे हा योग्य मार्ग नव्हे. आम्ही याचे समर्थन करत नाही.” त्यांनी हेही स्पष्ट केले की, गायकवाड यांना अन्न घेतल्यानंतर उलट्या झाल्या होत्या, त्यामुळे त्यांनी संतप्त होऊन ही कारवाई केली असावी, पण कायदा हातात घेणे चुकीचे आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App