विशेष प्रतिनिधी
मुंबई : Abu Azmi मराठी भाषा ही महाराष्ट्राची अस्मिता असून तिचा आदर सर्वांनी केला पाहिजे. मात्र काही राजकीय पक्ष केवळ निवडणूक जिंकण्यासाठी मराठी विरुद्ध हिंदी असा कृत्रिम वाद निर्माण करून जनतेच्या भावना भडकवत असल्याचा गंभीर आरोप समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केला आहे.Abu Azmi
राज्यात सध्या निर्माण झालेल्या मराठी-अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना आझमी म्हणाले, “मराठी ही आपल्या सर्वांची शान आहे. मी स्वतः मराठी भाषेचा सन्मान करतो. पण फक्त भाषेच्या मुद्द्यावरून अमराठी माणसांवर हल्ले करणे, त्यांना धमकावणे किंवा मारहाण करणे ही अतिशय धोकादायक आणि विभाजनवादी प्रवृत्ती आहे. महाराष्ट्र ही सर्व भाषिक, सर्व जातीधर्मीय लोकांची भूमी आहे. इथे देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लोकांना पोटभर अन्न, रोजगार आणि सन्मान मिळाला आहे. उत्तर भारतातून, राजस्थानातून आलेले हजारो कष्टकरी इथे रात्रंदिवस कष्ट करून प्रगती करत आहेत. त्यांच्यावर हल्ले होणे हे अत्यंत निंदनीय आहे. या घटनांवर सरकारने त्वरित आणि कठोर कारवाई केली पाहिजे.
अबू आझमी यांनी आरोप केला की, “काही पक्ष मराठी माणसाच्या नावावर निवडणुकीत राजकीय फायदा मिळवण्यासाठी अमराठी विरोधाची आग भडकवत आहेत. हा मतांसाठी रचलेला पोकळ खेळ आहे. या प्रकारात खरे मराठी प्रेम किंवा अभिमान नाही. जे खरोखर मराठी माणसाचा सन्मान करतात, ते कधीही दुसऱ्या भाषिकांवर हल्ला करणार नाहीत.”
अपने गली में कुत्ता भी शेर होता है, हे म्हणणे काही लोक वारंवार वापरतात. पण त्याचा अर्थ असा नाही की कुणावरही हात उगाराल. कायद्याचे राज्य असलेल्या देशात अशी हिंसक वर्तन म्हणजे गुन्हा आहे आणि त्या गुन्ह्याचा निषेध होणारच. राजकीय पक्षांनी समाजात द्वेष पसरवण्याचे काम थांबवावे. महाराष्ट्र ही सामाजिक ऐक्याची भूमी आहे. इथल्या लोकांनी परप्रांतीयांना नेहमी स्वीकारले आहे. त्यामुळे मराठी-अमराठी वाद टोकाला नेत एकमेकांवर हल्ले करणे थांबवावे आणि सर्वांनी मिळून राज्याच्या विकासासाठी काम करावे, असे आवाहन आझमी यांनी केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App