विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधानसभेत विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी संख्याबळ तोकडे, म्हणून महाविकास आघाडीचे नेते सरन्यायाधीशांकडे धावले!!, असे आज विधिमंडळात घडले. Leader of the Opposition
महाराष्ट्र विधिमंडळाने सरन्यायाधीश भूषण गवई यांचा आज विशेष सत्कार केला. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या या सत्कार समारंभाला सर्व पक्षांचे आमदार आणि नेते हजर होते. सर्व पक्षांच्या नेत्यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कार्याचा गौरव केला. संविधान हे रक्तहीन क्रांतीचे साधन असल्याचे सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले.
पण त्याचवेळी विरोधकांनी त्यांना भेटायची मोठी संधी साधली. महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी विरोधी पक्षांकडे 49 आमदारांची गरज आहे पण प्रत्यक्षात ती संख्या 46 आहे त्यामुळे अजून महाराष्ट्राला विरोधी पक्ष नेताच मिळालेला नाही. तो विरोधी पक्ष नेता द्यावा यासाठी महाविकास आघाडीचे आमदारांनी फडणवीस सरकारला साकडे घातले. पण विरोधी पक्ष नेते पदाचा निर्णय विधानसभेचे अध्यक्ष यांचा आहे, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने हात झटकले. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते तळमळले.
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सत्काराच्या निमित्ताने त्यांना भेटायची संधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी साधली. महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते पद द्यायला सांगा, अशी गळ त्यांनी सरन्यायाधीशांना घातली. त्या संदर्भातले निवेदन त्यांच्याकडे सोपाविले. आदित्य ठाकरे यांनी सरन्यायाधीशांच्या पुढे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या केसेसचा उल्लेख केला. महाराष्ट्र विधानसभेत महाविकास आघाडीचे संख्याबळ कमी पडले नसते, तर विरोधी पक्षनेता आधीच जाहीर झाला असता मग आघाडीच्या नेत्यांना सरन्यायाधीशांकडे धाव घेण्याची गरज उरली नसती. पण संख्या बळ कमी पडल्याने विरोधकांना सरन्यायाधीशांकडे धाव घेणे भाग पडले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App