विशेष प्रतिनिधी
मुंबई : Bhaskar Jadhav राज्याच्या अर्थसंकल्पीय व्यवहारांवर आणि निधीच्या वितरणावरून शिवसेना (ठाकरे गट) नेते व आमदार भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर विधानसभेत कडक शब्दांत टीका केली. “कोणाला किती निधी द्यायचा, हे अर्थमंत्री कसे ठरवू शकतात?” असा थेट सवाल करत त्यांनी अर्थविभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.Bhaskar Jadhav
भास्कर जाधव म्हणाले की, मार्चमध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर आता ५७ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या जात आहेत. “७ लाख ७५ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर झाला असूनही, अजून वर्षात दोन अधिवेशन बाकी आहेत. पुरवणी मागण्या पुन्हा पुन्हा मांडाव्या लागत आहेत. यावरून अर्थसंकल्पात तूट आहे हे स्पष्ट होते,” असे ते म्हणाले.
ते म्हणाले, “संगमेश्वर दौऱ्यानंतर गुहागर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यासाठी १० कोटींचा निधी मागितला होता. मात्र अजित दादांनी साधा होकारही दिला नाही.
भाजप आमदारही अर्थखात्यावर नाराजी व्यक्त करत असल्याचे सांगून जाधव म्हणाले, “शिवसेना तर आधीपासूनच तक्रार करत होती. हे खातं कोणी एकट्याने चालवायचं नसतं. आता राज्याच्या तिजोरीवर मोठं कर्ज आहे आणि ज्यांनी कर्ज घेतलं नाही त्यांच्या डोक्यावर ते लादलं जात आहे. अशी परिस्थिती आहे की, निधी दिला जात नाही आणि आम्हाला फक्त बोलून समाधान मानावं लागतं.”
जाधव यांनी जीएसटीचा मुद्दाही उपस्थित केला. “सध्या राज्याचं सगळं जीएसटीवर चालतंय. पण जीएसटी नसता तर काय झालं असतं? मग कुठून आणलात पैसे?” असा सवाल त्यांनी केला. तसेच, आपत्ती काळातसुद्धा निधी मिळवण्यासाठी सरकारला पुन्हा विधानसभेसमोर यावं लागतं, हे खेदजनक केलं.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App