विशेष प्रतिनिधी
मुंबई : MLA Apurva Hire राज्याच्या राजकारणात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या उलथापालथी सुरू असून, अनेक बडे नेते आता पक्षांतराच्या मार्गाने आपली पुढची वाट धरत आहेत. याच पार्श्वभूमीवर नाशिक आणि इंदापूर येथील राष्ट्रवादीच्या नेत्यांसह राजू शेट्टीचे सहकाऱ्याने कमळ हाती घेतले. नाशिकचे माजी शिक्षक आमदार अपूर्व हिरे, इंदापूरचे प्रवीण माने आणि राजू शेट्टी यांचे जवळचे सहकारी आणि शेतकरी नेते सावकार मादनाईक यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.MLA Apurva Hire
मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. दरम्यान, रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर हे पहिलेच पक्षप्रवेश पार पडले.MLA Apurva Hire
अपूर्व हिरेंचा शेकडो समर्थकांसह पक्षप्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार व प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अपूर्व हिरे यांच्या भाजप प्रवेशाबाबत गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा होती. अखेर आज त्यांनी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात शेकडो समर्थकांसह अधिकृत पक्षप्रवेश केला. यावेळी भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.MLA Apurva Hire
ग्रामीण व शहरी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी, आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचा विकासाभिमुख दृष्टिकोन आणि स्थिर नेतृत्व यामुळेच मी हा निर्णय घेतला, असे डॉ. हिरे यांनी प्रवेशानंतर स्पष्ट केले.
दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी थेट दूरध्वनीद्वारे डॉ. हिरे यांना पक्षप्रवेशासाठी आमंत्रण दिले होते. त्यानंतर त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा केली. या चर्चेनंतर आज हा पक्षप्रवेश पार पडला.
राजू शेट्टींचे साथीदार मादनाईकही भाजपवासी
राजू शेट्टींचे निकटवर्तीय आणि शेतकरी नेते सावकार मादनाईक यांनीही आज भाजपमध्ये प्रवेश केला. मादनाईक 2002 पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते होते आणि शेट्टींसोबत अनेक चळवळींमध्ये अग्रभागी राहिले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीतील भूमिका न पटल्यामुळे ते नाराज होते. अखेर माधवराव घाटगे यांच्या मध्यस्थीने भाजपकडून त्यांचा प्रवेश निश्चित झाला. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे, कारण मादनाईक हे संघटनेचे एक प्रभावी आणि जमीनीवरील कार्यकर्ते मानले जात होते.
इंदापुरात पवार काका-पुतण्यांना धक्का
शरद पवार यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक आणि इंदापूरच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या दशरथ माने यांचे पुत्र प्रवीण माने यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती असलेल्या प्रवीण माने यांनी भाजप प्रवेश करताच तालुक्यात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
मोदींच्या विचाराने प्रेरित होऊन मी प्रवेश करत आहे. राज्यात चौफेर विकासाची कामे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहेत. मी अपक्ष म्हणून लढलो आणि 40 हजार मते मिळवली होती. त्यानंतर कुठेतरी समाविष्ट होण्याची चर्चा कार्यकर्त्यांनी केली. या चर्चेतून भाजप हेच नाव पुढे आले. भाजपमध्ये सामान्य कार्यकर्त्यालाही सर्वोच्च पद मिळू शकते, याचे रविंद्र चव्हाण उदाहरण आहेत, असे पक्षप्रवेशावेळी प्रवीण माने म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App