Morgan Stanley : भारतासाठी आनंदाची बातमी: जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवरही भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने वाढणार, मॉर्गन स्टॅनलीचा विश्वास

Morgan Stanley

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Morgan Stanley जगभरातील अनेक अर्थव्यवस्था सध्या मंदीच्या छायेखाली असताना भारतासाठी मात्र दिलासादायक बातमी आली आहे. मॉर्गन स्टॅनलीच्या जागतिक गुंतवणूक समितीने (Global Investment Committee – GIC) आपल्या अहवालात स्पष्ट म्हटले आहे की भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था राहणार आहे. यामुळे भारतावर आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचा विश्वास अधिक बळकट होणार आहे.Morgan Stanley

मॉर्गन स्टॅनलीच्या नव्या अंदाजानुसार, 2025 मध्ये भारताचा नाममात्र जीडीपी वाढ दर 5.9% आणि पुढील आर्थिक वर्ष 2026 मध्ये हा दर 6.4% पर्यंत जाण्याची शक्यता आहे. जागतिक स्तरावर मंदीची स्थिती असतानाही भारताच्या मजबूत अंतर्गत मागणी, स्थिर धोरणे, आणि वाढत्या गुंतवणुकीमुळे ही वाढ शक्य होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जग मंदीच्या मार्गावर असताना भारताची अर्थव्यवस्था सशक्त वाढीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा विश्वास मॉर्गन स्टॅनलीने व्यक्त केला आहे. यामुळे भारत जागतिक गुंतवणुकीसाठी नवे आशास्थान (Bright Spot) ठरणार असल्याचे स्पष्ट होते.



या अहवालात चीनच्या अर्थव्यवस्थेचा नकारात्मक आढावा घेतला असून, अमेरिकन टॅरिफ धोरणांमुळे चीनमधील व्यापार संकुचित होण्याची शक्यता आहे. यामुळे 2025 मध्ये चीनचा वास्तविक जीडीपी फक्त 4.0% आणि 2026 मध्ये 4.2% राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

अमेरिकेचा जीडीपी वाढीचा दरही घटणार असून, 2024 मध्ये 2.5% असलेला नाममात्र जीडीपी वाढ दर 2025 आणि 2026 मध्ये फक्त 1% वर येईल, असा इशारा दिला गेला आहे. हे अमेरिका-चीन दरम्यानच्या व्यापार तणावाचे आणि धोरणात्मक अनिश्चिततेचे प्रत्यक्ष परिणाम असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

जागतिक पातळीवर आर्थिक वाढीमध्ये घसरण होण्याची शक्यता आहे. अहवालात म्हटले आहे की 2024 मधील जागतिक जीडीपी वाढ दर 3.5% वरून 2025 मध्ये 2.5% पर्यंत खाली येऊ शकतो. अनेक देश आपली संभाव्य वाढ गमावण्याच्या मार्गावर असतील. मात्र भारत या पार्श्वभूमीवरही मजबूत स्थितीत राहील, असे मॉर्गन स्टॅनलीने ठामपणे सांगितले आहे.

भारत सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या उत्पादन आणि निर्यात वाढीच्या धोरणांना तसेच डिजिटल क्रांतीला, स्टार्टअप्सना आणि आंतरराष्ट्रीय व्यापार सुधारणा उपक्रमांना या वाढीचे श्रेय दिले जात आहे. कॅपेक्स (Capital Expenditure) वाढ, इन्फ्रास्ट्रक्चरवर लक्ष, आणि उत्पादनक्षमता वाढवणारी धोरणे या भारताच्या प्रगतीत निर्णायक ठरतील.

Good news for India: Morgan Stanley believes that the Indian economy will grow rapidly despite the global recession

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात