काँग्रेस केंद्रात सत्तेवर आली, तर आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कायमची बंदी घालू, असे वक्तव्य काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे चिरंजीव कर्नाटक मधले मंत्री प्रियांक खर्गे यांनी केले. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी राज्यघटनेतल्या सरनाम्यातल्या समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या दोन शब्दांवर आक्षेप नोंदविल्यानंतर काँग्रेस मधून ज्या तिखट प्रतिक्रिया उमटल्या, त्यापैकी एक प्रतिक्रिया प्रियांक खर्गे यांची होती. याचा अर्थ दत्तात्रय होसबळे यांनी केलेल्या वक्तव्याचा घाव काँग्रेसला वर्मी लागला असल्याचे स्पष्ट झाले. Congress
वास्तविक दत्तात्रय होसबळे यांनी पहिल्यांदाच काही “समाजवादी” आणि “धर्मनिरपेक्ष” या संकल्पनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, असे अजिबात नव्हते. याआधी अनेक वेळा या संकल्पनांवर दोन्ही बाजूंनी चर्चा झाल्या. त्याचा निकाल दोन्ही बाजूंनी आपापल्या पद्धतीने लावला. पण अंतिम निकाल कुणीच दिला नाही. देशाच्या राजकीय वातावरणात अशा वैचारिक चर्चा नेहमीच झडतात. नवे विषय आले की त्या मागे पडतात, असाच होसबळे यांच्या यांच्या वक्तव्यातला खरा प्रकार होता. पण “समाजवादी” आणि “धर्मनिरपेक्षता” हे दोन शब्द इंदिरा गांधींनी राज्यघटनेच्या सरनाम्यात आणल्याने काँग्रेससाठी हे दोन शब्द राजकीय दृष्ट्या “नाकातला केस” (नाक का बाल) झाला. त्यामुळे होसबळे यांनी सुरू केलेली चर्चा काँग्रेसच्या नेत्यांना टोचली. म्हणून त्यांनी पुन्हा एकदा संघावर बंदी घालायच्या बाता सुरू केल्या. Congress
वास्तविक काँग्रेसचे नेते वर्षानुवर्षे सत्तेवर राहिल्याने सगळे राजकारण कोळून प्यायलेले आहेत. वेगवेगळ्या संघटनांवर बंदी घालून कुठल्या संघटना संपत नसतात, याची त्यांना पक्की जाणीव आहे. तरीदेखील गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेसने राजकीय शहाणपण गमावल्याने संघावर बंदी घालायच्या बाता पुन्हा मारल्या गेल्या, ज्याचा संघावर 0 परिणाम झाला.
– संघावर तीनदा बंदी
संघावर आत्तापर्यंत तीन वेळा बंदी आल्या 1948, 1975 आणि 1992 या सगळ्या बंदी काळात संघाच्या शाखा बंद झाल्या. पण संघाचे काम बिलकुल थांबले नव्हते, हे सगळे काँग्रेसच्या सर्व स्तरांमधल्या नेत्यांना समजत होते. किंबहुना बंदी घातली जाणार याचे political fillers कितीतरी आधीपासून संघाला मिळायची व्यवस्था संघातल्याच नेत्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने केली होती. त्यामुळे बंदी आली तरी संघाचे काम थांबता कामा नये, याची “पूर्ण व्यवस्था” संघाच्या वरिष्ठ आणि मधल्या फळीतल्या नेत्यांनी प्रत्येक बंदीच्या वेळी केली होती.
1948 ची बंदी अधिक गंभीर होती. कारण तो विषयच गंभीर होता. पण तेव्हा सुद्धा संघाचे काम थंडावले, तरी नेहरू सरकार ते पूर्ण थांबवू शकले नव्हते. नंतर संघाने टप्प्याटप्प्याने “राजकीय शहाणपण” कमावत आपल्याला काळानुसार adjust केले. संघाच्या नावाने कुठल्याच assets ठेवायच्या नाहीत त्या वेगळ्या नावाने ठेवून वेगळ्या title खाली काम करत राहायचे, हे संघाने ठरविले. त्यानुसार संघ टप्प्याटप्प्याने काम करत गेला आणि वाढत गेला.
1975 सालच्या बंदीच्या काळात संघाच्या शाखा बंद झाल्या संघाचे स्वयंसेवक बंदीवासात गेले, पण संघाचे काम गुप्त पद्धतीने चालूच राहिले होते. उलट त्या काळात संघ अधिक वाढला. तो अधिक लोकांपर्यंत पोहोचला. संघाने याच कालावधीचा वापर करून विविध आंदोलनांचा पाया रचून घेतला, ज्याचे पडसाद 1980 च्या दशकात ठळकपणे उमटले.
1992 ची संघावरची बंदी हा तर मोठा “राजकीय विनोद” होता. तो ज्यांनी केला, त्या नरसिंह रावांना देखील आपण हा “राजकीय विनोद” करतोय हे माहिती होते. पण काँग्रेस मधल्या तीव्र प्रतिक्रिया थंडावण्यासाठी त्यांनी तो विनोद केला होता. 1992 च्या संघावरच्या बंदीच्या काळात संघावर कुठलाही प्रतिकूल परिणाम झाला नाही.
आता ज्यावेळी संघ शताब्दी साजरी करतोय आणि संघाचा विस्तार कधी नव्हे एवढा प्रचंड वाढलाय, त्यावेळी काँग्रेस सत्तेवर यायची स्वप्न बघतेय आणि सत्तेवर आल्यानंतर संघावर बंदी घालायची बाता मारतेय हा “राजकीय विनोद” 1992 पेक्षा मोठा आहे.
पण आपण “विनोद” करतोय हे तो करणाऱ्यांना समजत नाही, याचाच अर्थ काँग्रेसने “राजकीय शहाणपणा” गमावला आहे.
काँग्रेसच्या इतिहासात “राजकीय शहाणपण” गमावल्याची उदाहरणे फार नाहीत, पण सध्याच्या विरोधी पक्ष नेत्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जो राजकीय शहाणपणा गमावलाय, त्याला तोड नाही, आणि जी खरी तोड आहे, ती स्वीकारायची काँग्रेस नेत्यांची तयारी नाही. हे सगळे “कळत” असून काँग्रेस नेत्यांना “वळत” नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App