विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sudhir Mungantiwar हे काय दादा कोंडकेंचे उत्तर आहे का? हे द्वीअर्थी आहे का? असा सवाल करत माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार भर सभागृहात मंत्री संजय राठोड यांच्यावर भडकले भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मतदारसंघातील नाला रुंदीकरणाच्या मुद्यावरून विचारलेल्या प्रश्नांना व्यवस्थित उत्तर दिले नाही म्हणून जलसंधारण मंत्री संजय राठोड यांना चांगलेच सुनावले. मुनंगटीवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे नाराजी व्यक्त केली. यावर अध्यक्षांनी देखील मंत्री राठोड यांना अपेक्षित उत्तर देण्यास सांगितले. Sudhir Mungantiwar
“नाल्यांच्या योग्य नियोजनाअभावी नाल्यांशेजारी राहणाऱ्या वस्त्यांना फटका बसतो. नाल्यांची संरक्षक भिंत नियमांनुसार बांधली जात नाही. या प्रकरणी पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला तर सरकार त्या अभियंत्यावर कारवाई करणार का? याशिवाय जिथे – जिथे नाले असतील त्यांच्या दुरुस्तीविषयी सरकारचे नियोजन काय?” असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला केला. यावर उत्तर देताना मंत्री संजय राठोड म्हणाले की, “सरकार अशा नाल्यांचे सर्वेक्षण करेल. नाल्यांची रुंदी तपासून ती वाढवावी लागेल का ते पाहील. भूमीअभिलेख विभागाकरवी जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली चौकशी करेल. तसेच उर्वरित नाल्यांचे बांधकाम करण्यासंदर्भात जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवू.” मंत्री संजय राठोड यांचे उत्तर ऐकून सुधीर मुनगंटीवार यांचे समाधान झाले नाही. ते म्हणाले की, नाल्याची नैसर्गिक रुंदी जेवढी आहे, तेवढीच राहिली पाहिजे. सरकार याची खबरदारी घेणार आहे का? त्यावर मंत्री राठोड फक्त सजेशन फॉर ऍक्शन (यावर विचार करू किंवा सल्ला ऐकला असून, त्यावर कार्यवाही करू) असे त्रोटक उत्तर दिले. त्यावर मुनगंटीवर यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.
मुनगंटीवार म्हणाले की, “मंत्री संजय राठोड आमचे मित्र आहेत. पण नाल्यांची नैसर्गिक रुंदी कायम राहील का? असा माझा प्रश्न होता. त्यांनी सजेशन फॉर ॲक्शन एवढेच उत्तर दिले. हे ॲक्शन, ऑन्ली ॲक्शन, नो रिॲक्शन असे असले पाहिजे. मंत्र्यांकडून अपेक्षित आहे की, नाल्याची नैसर्गिक रुंदी काय राहिली पाहिजे. त्यांच्याकडून हमी यायला हवी की नाल्याची नैसर्गिक रुंदी तशीच ठेवली जाईल. ती हमी न देता सजेशन फॉर अॅक्शन हे काय उत्तर आहे का? हे तर द्विअर्थी उत्तर झाले. हे काय दादा कोंडकेंचे उत्तर आहे का? हे द्वीअर्थी आहे का? त्याऐवजी नाल्याची रुंदी निश्चित राहील याची हमी द्या.” असे ते म्हणाले. सुधीर मुनगंटीवार यांच्या या नाराजीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंत्री संजय राठोड यांना मुनगंटीवार यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार उपाययोजना करण्याची सूचना केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App