नाशिक : लोकसभेतल्या विरोधी पक्ष नेत्याच्या वर्षभराच्या कामाचा लेखाजोखा; संसदीय भाषणे सगळ्यात कमी, बाकीच्याच कार्यक्रमांचा गाजावाजा!!, हे सत्य दुसऱ्या तिसऱ्या कुणाच्या अहवालातून समोर आले नसून दस्तूर खुद्द राहुल गांधींच्या सोशल मीडिया अकाउंट वरून उघड झाले आहे. Rahul Gandhi
राहुल गांधींच्या लोकसभेतल्या विरोधी पक्ष नेतेपदाला एक वर्ष पूर्ण झाले. त्याबद्दल त्यांनी आपल्या वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंट वरून आपल्या कामाचा लेखाजोखा सादर केला. त्यामध्ये त्यांनी गेल्या वर्षभरात विरोधी पक्षनेता म्हणून आपल्याला आलेले अनुभव वेगवेगळ्या लेखांमधून सादर केले. आपण संविधानाची लढाई कशी लढलो देशाच्या अर्थव्यवस्थेवर कशी भाषणे केली नेमके काय बोललो मणिपूर शेतकरी दलित अंगणवाडी कार्यकर्ते यांच्या विषयी काय भूमिका मांडली यावर राहुल गांधींनी सविस्तर भाष्य केले. आपले लेख लोकांनी वाचावे असे आवाहन केले.
पण त्या पलीकडे जाऊन राहुल गांधींनी जी आकडेवारी सादर केली, त्या आकडेवारीतून त्यांनी संसदीय भाषणे सगळ्यात कमी आणि बाकीचेच कार्यक्रम जास्त केल्याचे उघड झाले. गेल्या वर्षभरात राहुल गांधींनी फक्त 16 संसदीय भाषणे केली. संसदीय भाषणांपेक्षा जास्त म्हणजे 18 प्रेस कॉन्फरन्स घेतल्या. त्यांनी 16 राज्यांचे दौरे केले. 35 अधिकृत कार्यक्रम केले. 60 पेक्षा अधिक जनसभांना संबोधित केले. 115 जनसंवाद कार्यक्रम केले. ही सगळी आकडेवारी ग्राफिक मध्ये मांडून त्यांनी सोशल मीडिया हँडलवर सादर केली. लोकसभेतले विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी सभागृहात प्रभावी भाषणे करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात तिथे सगळ्यात कमी भाषणे केली. आणि बाकीचेच कार्यक्रम जास्त केले हे सत्य या आकडेवारीतून समोर आले.
गेल्या वर्षभरामध्ये लोकसभेमध्ये अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. त्यातले सगळ्यात महत्त्वाचे विधेयक waqf सुधारणा कायद्यासंबंधी होते मात्र त्यावरच्या चर्चेला विरोधी पक्ष नेते म्हणून राहुल गांधींनी सुरुवात केली नाही, तर त्यांनी लोकसभेतले काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांना त्या चर्चेची सुरुवात करायला सांगितले.
राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण झाली त्याबद्दल लोकसभेत झालेल्या चर्चेची सुरुवात राहुल गांधींनी केली पण सुरुवातीलाच त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या लेखातला चुकीचा संदर्भ देऊन मोदी सरकारवर आणि सावरकरांवर टीका केली. लोकसभेत विरोधी पक्ष नेता म्हणून आपण सर्वांत कमी भाषणे केली याची कबुली त्यांनीच आकडेवारीतून दिली, पण जी कमी भाषणे केली, ती तरी खऱ्या अर्थाने किती प्रभावी ठरली?, हा सवाल त्यांना कोणी केला नाही. त्यामुळे त्या सवालाचे उत्तर त्यांना द्यावे लागले नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App