Jaishankar’s : दहशतवाद्यांना माफ करण्याचा काळ आता संपला वॉशिंग्टनमधून जयशंकर यांचा स्पष्ट इशारा

Jaishankar's

विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन :Jaishankar’s “दहशतवाद्यांना माफ करण्याचा काळ आता संपला आहे, आणि भारत आण्विक धमक्यांना घाबरणार नाही,” अशी ठाम भूमिका परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये मांडली. क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीपूर्वी बोलताना त्यांनी जगाला आवाहन केलं की, दहशतवादाच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करता ‘शून्य सहनशीलता’चं धोरण स्वीकारावं.Jaishankar’s

जयशंकर यांनी ठाम शब्दांत सांगितले की, दहशतवाद्यांना आणि त्यांच्या हल्ल्यांमध्ये बळी पडलेल्या निष्पाप लोकांना एकाच पातळीवर पाहणं अन्यायकारक आहे.दहशतवादी जर सीमेपलीकडे असतील, म्हणून त्यांच्यावर कारवाई करता येणार नाही – ही कल्पनाच भारत आता फेटाळून लावत आहे.



जयशंकर यांचे हे वक्तव्य भारताने नुकतीच राबवलेली लष्करी कारवाई ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं मानलं जात आहे. २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील बैसरण भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिक ठार झाले होते. या घटनेनंतर भारताने ७ मे रोजी जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि हिज्बुल मुजाहिदीनच्या तळांवर अचूक हवाई हल्ले करत आंतरराष्ट्रीय स्तरावर धडक प्रत्युत्तर दिलं.

या कारवाईनंतर पाकिस्ताननेही प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. ८ ते १० मे दरम्यान त्यांनी भारतीय लष्करी तळांवर हल्ल्याचा प्रयत्न केला, पण भारताने त्याच वेळेस पाकिस्तानच्या महत्त्वाच्या लष्करी यंत्रणांवर—जसे की रडार सिस्टिम्स, कमांड अँड कंट्रोल सेंटर आणि एअर डिफेन्स प्वाइंट्स—अचूक प्रत्युत्तर दिलं.
१० मे रोजी पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्याने युद्धविरामासाठी भारताशी संपर्क साधला आणि त्यानंतर तणाव निवळला.

न्यूयॉर्कमध्ये ‘न्यूजवीक’चे CEO देव प्रगाड यांच्याशी संवाद साधताना जयशंकर म्हणाले,

“जो हल्ला करेल, त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल. आण्विक धमक्या देणं हे दहशतवाद्यांना संरक्षण देण्यासाठीचं साधन होतं – पण भारत आता अशा ब्लॅकमेलला बळी पडणार नाही. दहशतवाद्यांना प्रॉक्सी म्हणत पाठीशी घालणाऱ्या शक्तींनाही आम्ही आता जवाब देणार आहोत.

भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर आपल्या दहशतवादविरोधी धोरणात निर्णायक बदल केला आहे. प्रत्येक दहशतवादी कृतीला त्वरित आणि ठोस प्रत्युत्तर देणं हीच भारताची ‘न्यू नॉर्मल’ भूमिका असेल.आजचा भारत केवळ सहन करणारा देश राहिलेला नाही, तर दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणारा जागतिक नेता म्हणून उभा आहे,” अशा शब्दांत त्यांनी भारताची उग्र आणि ठाम भूमिका मांडली.

Jaishankar’s clear warning from Washington: The time for forgiving terrorists is over

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात