Eknath Shinde : चर्चेत राहण्यासाठी नाना पटोलेंचा प्रयत्न होता का?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल

Eknath Shinde

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Eknath Shinde  पावसाळी अधिवेशनात विधानसभेच्या कामकाजात मंगळवारी गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. काँग्रेस नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष सुधा नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत थेट अध्यक्षाच्या आसनापर्यंत जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माफीची मागणी केली. त्यांच्या या कृतीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार टीका करत चर्चेत राहण्यासाठी नाना पटोलेंनी असा प्रयत्न केला का? असा सवाल उपस्थित केला.Eknath Shinde

भाजप नेते बबनराव लोणीकर तसेच कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा मुद्दा नाना पटोले यांनी उपस्थित केला. यावेळी बोलताना नाना पटोले यांनी मोदी तुमचे बाप असतील, शेतकऱ्यांचे नाही, असे वक्तव्य केले होते. थेट अध्यक्षाच्या डायसवर चढून राजदंडापुढे जाऊन लोणीकर प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागण्याची मागणी केली. यावर एकनाथ शिंदे यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली आहे.Eknath Shinde



नेमके काय म्हणाले एकनाथ शिंदे?

नाना पटोले हे स्वत: विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांना सर्व कामकाजाची माहिती आहे. विधानसभेच्या सभागृहाचे पावित्र्य राखले पाहिजे, हे देखील त्यांना माहीत आहे. पण ते आज एवढे हेक्टीक का झाले ते माहीत नाही. नाना पटोलेंकडून या कृतीची अपेक्षा नव्हती, असे एकनाथ शिंदे म्हणाले. त्यांची काँग्रेसमध्ये दिल्लीत चर्चा दिसत नव्हती. म्हणून आपल्या नावाची चर्चा झाली पाहिजे, पुन्हा प्रकाशझोतात यायला पाहिजे, यासाठी त्यांचा प्रयत्न होता का? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.Eknath Shinde

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “विधानसभेत जनतेनी त्यांना दिले झटके, काँग्रेस सोळा पे लटके या अवस्थेत आहेत. आजच्या घटनेतून नाना पटोलेंनी काहीतरी बोध घेतला पाहिजे.” शिंदे यांनी नाना पटोलेंच्या विधानावर टीका करत त्यांची ही कृती केविलवाणी असल्याचे म्हटले.

बाप तो बाप होता है

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख करणे, हे देखील नियमाला आणि आपल्या परंपरेला धरून नाहीये. त्यामुळे पंतप्रधानांचा आदर केला पाहिजे. काँग्रेसचे राहुल गांधी देशाच्या बाहेर जाऊन देशाची, पंतप्रधान नरेंद्र मोदींची बदनामी करतात. आता नाना पटोले यांनी देखील पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख करून चर्चेत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला आहे, मोदींवर टीका करून चर्चेत राहता येते, त्यामुळे ‘बाप तो बाप होता है’ असा टोलाही शिंदेंनी नाना पटोले यांना लगावला.

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर बोलणे टाळले

मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून ५ जुलै रोजी सरकारने हिंदी सक्तीच्या निर्णयाचे दोन्ही जीआर रद्द केल्यामुळे विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकाद्वारे मराठी जनतेला विजयी मेळाव्याला येण्याचे आवाहन केले आहे. याबाबत एकनाथ शिंदे यांना विचारले असता, त्यांनी यावर बोलणे टाळले.

Eknath Shinde Questions Nana Patole’s Assembly Stunt

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात