विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी आज बिनविरोध निवड करण्यात आली. पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ही घोषणा झाली त्यानंतर वरळीत भाजप कार्यकर्त्यांच्या जाहीर मेळाव्यात रवींद्र चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी भाजपचे केंद्रीय निरीक्षक कायदेमंत्री किरण रिजिजू, अरुण कुमार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, अशोक चव्हाण आदी नेते उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्षपद स्वीकारताना रवींद्र चव्हाण यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर सविस्तर पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी भाजपमध्ये छोट्यातला छोटा छोटा कार्यकर्ता कसा मोठा होतो, त्याला काम करण्याची कशी संधी मिळते याचे सविस्तर वर्णन केले.
रवींद्र चव्हाण यांची पोस्ट अशी :
भाजपा हीच माझी ओळख ! २५ वर्षांपूर्वी भारतीय जनता पार्टीच्या भारतीयत्व जपणाऱ्या विशाल विचारधारेत सामील झालो. आपली विचारधारा विशाल गंगेप्रमाणे पवित्र आणि प्रवाही आहे. ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ हा विचार देणाऱ्या गंगेने मुख्य प्रवाहात मला सामावून घेतले. या विचारधारेने सामाजिक भान दिलं, आयुष्याच्या वळणावर मार्गक्रमण करण्याचं ध्येय दिलं, जगण्याची दिशा दिली. आपल्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याने जर विचारधारेचे रक्षण केले तर विचारधारा तुमचे रक्षण करेल, हे मी स्वतःच्या अनुभवावरून सांगू शकतो.
पक्षश्रेष्ठींचे मार्गदर्शन, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोलाची साथ तसेच लोकांचे शुभाशीर्वाद हेच माझे बलस्थान आहे आणि त्याचसोबत सर्वांचे प्रेम आणि विश्वास या शिदोरीच्या बळावरच प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा स्वीकारत आहे. यापुढील प्रवासातही तुम्हा सर्वांचा स्नेह, विश्वास आणि आपुलकी या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. आज भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचू शकतो, ही संघटनेची ताकद आहे. अशी ताकद भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मिळो यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन ही ग्वाही देतो. माझ्यावर विश्वास दाखवून प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा माझ्या हाती सोपवल्याबद्दल आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय मंत्री आदरणीय अमितभाई शाह, राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जे. पी. नड्डाजी, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह भाजपा परिवारातील सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार !
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App