नाशिक : २०२६ – २७ मध्ये होणारा नाशिक आणि त्रंबकेश्वरचा सिंहस्थ कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने एक ऐतिहासिक, सांस्कृतिक उपक्रम पूर्णत्वास नेण्याचा संकल्प केला असून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आधी गोदावरी महात्म्याचे दस्तावेजीकरण करण्यात येणार आहे. Ramtirth Godavari seva samiti
नाशिक आणि त्रंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे अध्यात्मिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व काय?, त्यांचे नेमके संदर्भ काय?, यावर वैदिक, पौराणिक, ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे प्रकाश टाकायचा रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचा मानस आहे. यासाठी इतिहास संकलन समितीचे संशोधन कार्य सुरू आहे. सिंहस्थ कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी रामतीर्थ गोदावरी सेवा समिती एक संदर्भ ग्रंथ प्रकाशित करणार असून त्यातून पुढच्या पिढ्यांसाठी गोदावरी महात्म्याचे दस्तावेजीकरण करण्यात येणार आहे. यात पेशवाई काळापासून ते 2015 च्या सिंहस्थ कुंभमेळ्या पर्यंतची मूळ ऐतिहासिक कागदपत्रे, छायाचित्रे, नकाशे, तज्ञांचे लेख आणि अनेक अधिकृत संदर्भ यांचा समावेश असणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळा पर्यावरण पूरक आणि हरित व्हावा यासाठी सेवा समितीने पुढाकार घेतला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने एक पर्यावरण पूरक काम करणारी एक जन चळवळ उभी करण्याचा मानस असून त्यामध्ये समाजातल्या सर्व स्तरांमध्ये युवक, युवती, स्वयंसेवक सांस्कृतिक दूत, डिजिटल प्रचारक, महिला स्वयंसहाय्यता गट, बचत गट, निवृत्त अधिकारी यांचा समावेश करण्याचा सेवा समितीचा प्रयत्न आहे.
या संदर्भातली सविस्तर माहिती रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने पत्रकार परिषदेत दिली. समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी, विश्वस्त धनंजय बेळे, नरसिंह कृपादास, आर्किटेक शैलेश देवी, इस्कॉन मंदिराचे कृष्णधन प्रभू आदींनी पत्रकार परिषदेला संबोधित केले.
– स्टीलची 30 लाख ताटे, ग्लास, कापडी पिशव्या वाटप
त्याचबरोबर सिंहस्थ कुंभमेळा हा पावसाळ्यातच येत असल्यामुळे सगळीकडे चिखल, ओलावा, गर्दी यामुळे यापूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन त्याच्या अडचणी निवारण्यासाठी समितीने कार्यात्मक पुढाकार घेतला आहे. रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने पुनर्वापर योग्य स्टीलची 30 लाख ताटे आणि क्लास तसेच कापडी पिशव्यांचे वाटप करण्याचे ठरविले आहे. समितीने त्या संदर्भात नियोजन केले आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या प्रदूषण नियंत्रण महामंडळाचा तांत्रिक सल्ला आणि सहकार्य समिती घेणार आहे. त्याचबरोबर नाशिक मधल्या उद्योग संघटना, समाजसेवी संस्था, दानशूर व्यक्ती यांचे देखील या उपक्रमासाठी विविध प्रकारे सहकार्य घेण्याचा सेवा समितीचा मानस आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापर्यंत सेवा समितीने विद्यार्थ्यांकरिता प्रवाह पर्यावरण शिबिरे, सेवा प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली असून त्यामध्ये विविध बचत गट औद्योगिक आस्थापना विविध गणेश मित्र मंडळ यांनाही सामावून घेतले जाणार आहे.
गोदावरी महात्म्याचे दस्तावेजीकरण
सिंहस्थ कुंभमेळा दर बारा वर्षांनी येतो. मात्र त्या संदर्भात योग्य माहिती आणि ऐतिहासिक संदर्भ देण्याच्या दृष्टिकोनातून गोदावरी सेवा समितीने गोदावरी नदीच्या ऐतिहासिक सांस्कृतिक आणि अध्यात्मिक संशोधनावर आधारित संदर्भ ग्रंथ प्रकाशित करण्याचे ठरविले आहे. हा ग्रंथ जनसामान्य भक्त आणि अभ्यासक यांना वितरित करून गोदावरीचे ऐतिहासिक सांस्कृतिक आणि अध्यात्मिक महात्म्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी समिती प्रयत्न असणार आहे.
या पत्रकार परिषदेला रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे सचिव मुकुंदा खोचे, स्वागत समितीचे प्रमुख रामेश्वर मालाणी, रणजीत सिंग आनंद, माध्यम संपर्कप्रमुख राजेंद्र फड, वैभव क्षेमकल्याणी, शिवाजी बोंदर्डे आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App