सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचा राहणारा तुषार रुपारेल कॉलेजच्या नाट्य विभागात सक्रिय होता.
विशेष प्रतिनिधी
मुंबई – Marathi actor मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनयाद्वारे प्रसिद्धी मिळवणाऱ्या तुषार घाडीगावकरने शुक्रवारी आत्महत्या केली. काम न मिळाल्याच्या ताणामुळे त्याने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे. त्याच्या अचानक निधनाने मराठी मनोरंजन विश्वासह त्याचे कुटुंब, मित्र आणि चाहत्यांना धक्का बसला आहे.Marathi actor
मूळचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचा राहणारा तुषार रुपारेल कॉलेजच्या नाट्य विभागात सक्रिय होता. कॉलेजनंतर त्याने नाट्य, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमातून अभिनय प्रवास सुरू केला. पण त्याच्या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे त्याचा अभिनय प्रवास थांबला आहे. सध्याच्या तणावपूर्ण वातावरणात कामाच्या अपुऱ्या संधी आणि मानसिक दबावामुळे त्याने हा निर्णय घेतल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेता अंकुर वाढे यांनी फेसबुकवर भावनिक श्रद्धांजली वाहिली आणि लिहिले, ‘का मित्रा? कशासाठी? काम येते आणि जाते! आपण मार्ग शोधला पाहिजे, पण आत्महत्या हा मार्ग नाही! तुषार, जर तू हरलास तर आपण सर्व हरलो.’ मुग्धा गोडबोले, समीर पाटील आणि अभिषेक देशमुख यांसारख्या अनेक कलाकारांनीही सोशल मीडियावर तुषारच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App